रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ- अशी होणार मतमोजणी!

रत्नागिरी (प्रतिनिधी)- रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाची मतमोजणी प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय १४ टेबलवरती फेरीनिहाय होणार आहे. रत्नागिरी, राजापूर मतदार संघाच्या प्रत्येकी २५ फेऱ्या, चिपळूण, कणकवली प्रत्येकी २४ फेऱ्या, सावंतवाडी २२ फेऱ्या तर, कुडाळ मतदार संघात २० फेऱ्या होणार आहेत; अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली आहे.

मिरजोळे एमआयडीसीतील भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामात ही मतमोजणी सकाळी ८ वा. सुरु होईल. टपाली मतदान मतमोजणीसह प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय एकाच वेळी मतमोजणीला प्रारंभ करण्यात येणार आहे.

चिपळूण- ३३६ मतदान केंद्र – १४ टेबलवर २४ फेऱ्यांमध्ये,
रत्नागिरी- ३४५ मतदान केंद्र- १४ टेबलवर २५ फेऱ्यांमध्ये,
राजापूर- ३४१ मतदान केंद्र- १४ टेबलवर २५ फेऱ्यांमध्ये,
कणकवली- ३३२ मतदान केंद्र- १४ टेबलवर २४ फेऱ्यांमध्ये,
कुडाळ- २७८ मतदान केंद्र- १४ टेबलवर २० फेऱ्यांमध्ये,
सावंतवाडी- ३०८ मतदान केंद्र- १४ टेबलवर २२ फेऱ्यांमध्ये

ही मतमोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी येणाऱ्या उमेदवारांच्या प्रतिनिधींना प्रत्यक्ष मतमोजणीच्या ठिकाणी मोबाईल आणता येणार नाही. याठिकाणी मोबाईल वापरावर भारत निवडणूक आयोगाने संपूर्णपणे निर्बंध घातले आहेत असे आवाहनही निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केले आहे.