सिंधुदुर्ग जिल्हा खादी संघ, गोपुरी आश्रमच्या अध्यक्षपदी पुन्हा प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर यांची निवड!

कणकवली:- कोकणचे गांधी आप्पासाहेब पटवर्धन प्रस्थापित रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा खादी संघ, गोपुरी आश्रम (वागदे ता. कणकवली) ची सन २०२०-२१ ते २०२२-२३ या तीन वर्षांकरिता झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पुढील कार्यकारणीची एकमताने निवड करण्यात आली.

विद्यमान अध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर यांची अध्यक्ष पदावर तर सचिव मंगेश नेवगे यांचीही सचिव पदावर पुन्हा नियुक्ती करण्यात आली. उपाध्यक्षपदी रवींद्रनाथ मुसळे (गुरुजी) व खजिनदार म्हणून अमोल भोगले यांची निवड करण्यात आली. विनायक ऊर्फ बाळू मेस्त्री (कणकवली), युयुत्सु आर्ते (देवरुख), बाळासाहेब लबडे, अ‍ॅड. मनिषा पाटील (पूणे) व अर्पिता मुंबरकर (कणकवली) यांची संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

You cannot copy content of this page