मधुकर नगर येथील जेष्ठ नागरिकांचा सन्मान व गावातील गुणीजनांचा सत्कार संपन्न
पालघर (नरेंद्र हरिभाऊ राऊत):- महाशिवरात्रीचे औचित्य साधून, दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मधुकर नगर येथील, ग्रामदैवत शेडदेव मंदिराच्या प्रागंणात, मंदिर समिती व नवयुग मित्र मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आणि श्री. शशांक पाटील यांच्या सौजन्याने, ज्येष्ठ नागरिक ग्रामस्थांचा भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
सोपाक्ष संघाचे माजी अध्यक्ष व साहित्य सेवक श्री.वंदेश देवजी पुरव, कृषी व्यवसायिक व सामाजिक कार्यकर्ते श्री. किशोर गजानन राऊत, मुंबईच्या पोद्यार विद्यालयात अध्यापन करणाऱ्या श्रीमती रागिणी पाटील, व्यावसायिक स्व. करण राऊत यांच्या पत्नी श्रीमती कविता करण राऊत व ज्येष्ठ ग्रामस्थ श्री सुरेश दामोदर पाटील यांचा सन्मान सोहळा नवयुग मित्र मंडळाचे माजी अध्यक्ष श्री. गोपीनाथ टी. पाटील, यांच्या संकल्पनेतून भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन साकार झाला.
त्यांनतर मधुकर नगर येथील मंदिर समितीच्या संकल्पनेतून गुणीजनांचा सन्मान करण्यात आला. प्रामुख्याने, वाशी येथे एमजीएम हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय सेवा देणाऱ्या, डॉक्टर कुमारी आयुश्री राकेश राऊत व मुंबई हायकोर्ट मध्ये न्याय-विद्यी क्षेत्रात सेवा देणाऱ्या कुमारी यशश्री राकेश राऊत, ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे मास्टर प्रोफेशनल इंजिनिअरिंग रोबोटिक्स तज्ञ कुमार दैविक प्रवीण पाटील, तसेच एन एफ ए टी चे मेडिकल सायन्स फॉरेन्सिक तज्ञ कुमार मानस दीपक पाटील व इंटरनॅशनल एरोमेटीक टास्क फोर्स आणि इस्रो इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन, सन्मानित सौ. नेहा तथा पुर्वाश्रमीच्या नक्षत्रा विभाकर राऊत, कॅनडा येथे उच्चायुक्त पॅनोरमिक-ईंडीयाच्या अध्यक्षा सौ. वैदेही अविनाश भगत तथा पुर्वाश्रमीच्या वैदही वसंत राऊत, वेस्ट मिनिस्टर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट मॅनेजमेंट मध्ये मास्टर इन सायन्स मेरिटमध्ये सुयश मिळविणारे कुमार ओमकार कौशिक पुरव, सोपाक्ष संघाच्या विद्यमान उपाध्यक्षा सौ. प्रवीणा राजेंद्र पुरव व दिनबंधू सामाजिक बांधिलकी पुरस्कार, सन्मानित श्री. सुरेश शाळीग्राम पुरव, तसेच मुंबईतील ४२ किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेत योगदान देणारे निवृत्त वरीष्ठ पोलीस आयुक्त श्री. प्रवीण गजानन पाटील, होतकरू कविवर्य श्री. विजय गोविंद पुरव, कुमारी डॉक्टर जूही मंगेश राऊत, जिल्हास्तरीय साद-पडसाद वार्तांकित करणारे मुक्त पत्रकार आणि श्री माताई देवी सेवा संस्था, सर्वेसर्वा माजी उपाध्यक्ष, श्री नरेंद्र हरिभाऊ राऊत,आदर्श शिक्षक म्हणून गौरवण्यात आलेले योगेश गोविंद पुरव, तपस्या संजय पाटील इत्यादीचा पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान – सत्कार करण्यात आला.
मंचावर नवयुग मित्र मंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष श्री. कौशिक विष्णु पुरव,सचिव – श्री उल्हास पुरव , खजिनदार – श्री. योगेश पुरव, माजी अध्यक्ष गोपीनाथ पाटील, सोपाक्ष संघाचे माजी अध्यक्ष दिनेश पाटील (नरपड), उपसरपंच श्री. जयवंत पाटील, श्री माताई देवी सेवा संस्था,अध्यक्षा सौ. मीना विनायक राऊत, इत्यादी मान्यवर विराजमान होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सुरेश पुरव आणि राजेंद्र पुरव यांनी संयुक्तपणे केले. जेष्ठ ग्रामस्थ जितेंद्र आ. पुरव, दीपक पांडुरंग पुरव, जगदीश पाटील,सौ. प्रवीणा पुरव व संदेश राऊत यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.
शेवटी कुमारी डॉ. आयुश्री राकेश राऊत यांच्या विशेष आर्थिक योगदानाने दिलेल्या स्नेहभोजनाचा आस्वाद घेऊन उत्कृष्टरित्या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यामुळे सर्वांची मने प्रसन्न झाली. असे सोहळे पुन्हा पुन्हा आयोजित व्हावेत हीच सदिच्छा सर्व कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.