शामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय अर्थिक विकास महामंडळाच्या विविध योजना

सिंधुदुर्गनगरी दि.13 (जि.मा.का): शामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय अर्थिक विकास महामंडळ, जिल्हा कार्यालय सिंधुदुर्ग यांचा मार्फत राबवित असलेल्या 20 टक्के बील भांडवल, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा,गट कर्ज व्याज परतावा व रुपये 1.00 लक्ष थेट कर्ज योजनांतर्गत सन 2021-22 या वित्तीय वर्षासाठी भौतिक व आर्थिक उद्दीष्ट निश्चित करण्यात आली असून ती पुढील प्रमाणे आहेत.

बीज भांडवल कर्ज योजना:- योजनेत कर्जाची मार्यादा ही रुपये 5.00 लक्ष असून कर्जाची मुदत 5 वर्षे आहे. या योजनेमध्ये महामंडळाचा सहभाग 20 टक्के बँकेचा सहभाग 75 टक्के व लाभार्थी हा 5 टक्के असतो. महामंडळाच्या कर्ज रकमेवर द.सा.द.शे 60 टक्के व्याज आकारले जाते व बँकेच्या कर्ज रकमेवर बँकेच्या नियमानुसर व्याज आकारले जाते. योजनेचे कर्ज अर्ज जिल्हा कार्यालय येथे उपलब्ध आहेत.

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना:- योजनेत कर्जाची मर्यादा रुपये 10.00 लक्ष असून ही योजना ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. सन 2021-22 या वर्षाकरीता भौतिक उद्दिष्ट 160 असून आर्थिक उद्दिष्ट रुपये 182.40 लक्ष असून ही व्याज परताव्याची रक्कम आहे. कर्जाचे हप्ते वेळेवर भरल्यास 12 टक्के पर्यतचा व्याज लाभार्थीच्या बचत खात्यात जमा करण्यात येणार आहे. योजनतेचे अर्ज ऑनलाईन पध्दतीने www.msobcfdc.org या महामंडळाच्या वेबसाईटवर व्याजपरतावा मध्ये नावनोंदणी करुन सादर करावयाचे आहेत.

गट कर्ज व्याज परतावा योजना:- योजनेची मर्यादा रुपये 50.00 लक्ष पर्यतची असून गटातील व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. सन 2021-22 या वर्षाकरिता भौतिक उद्दिष्ट 30 असून आर्थिक उद्दिष्ट रुपये 171.00 लक्ष असून व्याज परताव्याची रक्कम आहे. कर्जाचे हप्ते वेळेवर भरल्यास 12 टक्के पर्यतचा व्याज लाभार्थीच्या बचत खात्यात जमा करण्यात येणार आहे. योजनेचे अर्ज ऑनलाईन पध्दतीने www.msobcfdc.org या महामंडळाच्या वेबसाईट वर व्याजपरतावा मध्ये नावनोंदणी करुन सादर करावयाचे आहेत.

थेट कर्ज योजना :- योजनेत कर्जाची मर्यादा रुपये 1.00 लक्ष असून मुदत 4 वर्षे आहे. महामंडळाकडून ही योजना बिनव्याजी असून मुदतीत कर्ज न भरल्यास द.सा.द.शे. 4 टक्के व्याजदर आकरण्यात येतो. या योजनेकरिता वार्षिक उत्पन्नाची उट रु 1.00 लक्ष आहे. तसेच अर्जदाराचा सिबील स्कोर कमीत कमी 500 असणे आवश्यक आहे.

सन 2021-22 या वर्षाकरिता थेट कर्ज योजनेचे भौतिक उद्दिष्ट 120 असून आर्थिक अद्दिष्ट रुपये 120.00 लक्ष देण्यात आले आहे. कर्ज योजनांच्या आधिक माहितीसाठी महामंडळाच्या वरील पत्यावर संपर्क योजनांची माहिती घ्यावी.

You cannot copy content of this page