जलशक्ती अंतर्गत ‘कॅच द रेन’ अभियान सिंधुदुर्गात राबविणार!

सिंधुदुर्गनगरी, दि. ३१ (जि.मा.का.) – जलसंधारण, रेन वॉटर हार्वेस्टिंग, पारंपरिक तसेच जलस्त्रोतांचे नुकनीकरण, पाण्याचा पुनर्वापर आणि स्त्रोत पुनर्भरण, पाणलोट विकासासाठी केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयाच्यावतीने जलशक्ती अभियानांतर्गत `कॅच द रेन’ अभियान सुरू करण्यात आले आहे.

या अभियानाचा शुभारंभ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. ३० मार्च ते ३० सप्टेंबर २०२२ या दरम्यान चालणाऱ्या या अभियानांतर्गत जलशक्ती अभियान आराखडा तयार करण्यात येणार आहे. या आराखड्यात जलसंधारण आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग, पारंपरीक तसेच जलस्त्रोताचे नुकनीकरण, पाण्याचा पुनर्वापर आणि स्त्रोत पुनर्भरण, पाणलोट विकास, गहन वृक्षारोपण, गावात १०० टक्के शोषखड्डे, सर्व शासकीय कार्यालये व स्वराज्य संस्था कार्यालयामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग, मनरेगा अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या विहिरी १०० टक्के पूर्ण करणे, शेततळी खोदणे, गावात १०० टक्के शोषखड्डे व ग्रुप रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे या बाबी समाविष्ट असणार आहेत. ही कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करायची असल्याने सर्व विभागांच्या सहकार्याने ग्रामपंचायत स्तरावर तसे नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी दिल्या.

You cannot copy content of this page