वर्सोवा महोत्सवात कॉस्मोपॉलिटन को-ऑप. सोसायटी असोसिएशनच्या महिलांचा यशस्वी सहभाग!
मुबई:- लोकप्रिय आमदार डॉ. भारतीताई लव्हेकर आयोजित वर्सोवा महोत्सव – २०२२ अंतर्गत बुधवार १८ मे २०२२ रोजी झालेल्या कार्यक्रमात कॉस्मोपॉलिटन को-ऑप. सोसायटी असोसिएशनच्या श्रीमती सरोज शनिश्चर, राजश्री पेणकर,महिमा पेणकर, दक्षिता मिश्रा, मंजू गुप्ता ह्या भगिनींनी सहभाग घेऊन आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले. विशेषतः श्रीमती सरोज शनिश्चर (वय ७५ वर्षे) यांनी घेतलेल्या उत्साहपूर्वक सहभागाबद्दल आमदार भारतीताई लव्हेकर यांनी त्यांचे विशेष कौतुक केले. तर सदर कार्यक्रमांचे सुत्रसंचालन श्रीमती मंजू गुप्ता यांनी केले. कार्यक्रमात सहभागी झालेल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सोसायटीमधील बहुसंख्य महिला उपस्थित होत्या!
कॉस्मोपॉलिटन को-ऑप. सोसायटी असोसिएशनच्या लहान-थोर महिलांनी भाग घेऊन आपल्या सोसायटीचा नावलौकिक वाढविला. त्या सर्व महिला सभासदांवर अभिनंदनाचा वर्षाव सर्व थरातून होत आहे.
कॉस्मोपॉलिटन को-ऑप. सोसायटी असोशिएशनचे अध्यक्ष – प्रमोद मेंडण, सेक्रेटरी- मोहन सावंत, खजिनदार- मुक्तार अहमद आणि पदाधिकाऱयांनी सर्वांचे कौतुक केले आहे.