पुलवामा येथे जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा जगभरातून सर्व स्तरावरून तीव्र निषेध!

नवी दिल्ली:- काल सायंकाळी पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या गाडीवर आत्मघातकी हल्ला करून दहशतवाद्यांनी कौर्याची परिसिमा गाठली! त्याचा सर्व देशभरातून तीव्र निषेध होत असून भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री राजनाथ सिंह तसेच सर्व केंद्रीय मंत्र्यांसह देशातील सर्व जनतेने तीव्र शब्दात दहशतवाद्यांचा धिक्कार केला आहे! त्याचप्रमाणे शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे म्हटले आहे!

जगातील अनेक राष्ट्रांनी ह्या क्रूर घटनेचा निषेध करून दहशतवादविरोधात भारताच्या पाठीशी असल्याचे जाहीर केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *