पोलीस यंत्रणेवर कामाचा ताण; अधिकाऱ्यांची ४ हजारपेक्षा अधिक पदे रिक्त

नागपूर;- राज्य पोलीस दलातील रिक्त पदे, निवृत्त होणाऱ्यांची संख्या व गुन्ह्याच्या नोंदीत वाढ इत्यादी कारणांमुळे पोलीस उपनिरीक्षकापासून पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांपर्यंत शारीरिक तसेच मानसिक तणाव वाढत असून त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत आहे.

राज्यात सध्या सुमारे ४ ते ५ हजार पोलीस अधिकाऱ्यांची पदे रिक्त असून सुद्धा पदभरती बंद आहे, शिवाय पोलीस दलात कार्यरत व पदोन्नतीच्या कक्षेत असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना पदोन्नती दिली नसून अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. त्यामुळे ह्या सर्वचा तणाव अधिकाऱ्यांवर सतत वाढत आहे. मात्र, पदोन्नतीबाबत तसेच पदभरतीबाबत गृहमंत्रालय आणि महासंचालक कार्यालय मौन बाळगून आहे.

पोलीस निरीक्षकाची बरीच पदे रिक्त असल्यामुळे अनेक पोलीस ठाण्याला प्रभारी पद नाही. तसेच काही संवेदनशील गुन्ह्याचा तपास करण्याकरिता सुद्धा निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची कमतरता असून अडचणी निर्माण होत आहेत.

You cannot copy content of this page