पॅन कार्ड व आधार कार्ड लिंक करण्यास ३१ मार्च २०१९ पर्यंत मुदतवाढ
नवी दिल्ली:- पॅन कार्ड व आधार कार्ड लिंक करण्याची मुदत ३० जून २०१८ संपत होती. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सने पॅनकार्ड आधार कार्डला जोडण्यासाठी आतापर्यंत पाच वेळा मुदत वाढवून दिली आहे. आता ही मुदतवाढ ३१ मार्च २०१९ पर्यंत वाढविण्यात आली आहे. आता पुढील वर्षाच्या मार्चअखेरपर्यंत पॅन-आधार लिंक करता येणार आहे.
ह्या संदर्भात मागील बातमीची लिंक https://starvrutta.com/pan-adhar-link-last-day/