समर्थाची शिकवण
विद्वान हो! समर्थांच्याच नव्हे तर दिव्य संताच्या शब्दातील स्पंदने इतकी विर्यवान् असतात की, त्या स्पंदनांमुळे हृदयपरिवर्तन सहज होते. उपहासाने म्हणावेसे वाटते आजच्या हजारो वक्तव्यांच्या शेकडो भाषणाच्या अर्थहीन स्वार्थलोलुप वक्तव्याच्या तुलनेत समर्थ रामदास स्वामींचा एक ‘शब्द’ लाख मोलाचा होता. समर्थांकडे काय नव्हते? वक्तव्याचे वक्तृत्व, कवीचे कवित्व, शुराचे शुरत्व, राजकारणातील राजनीतीतज्ञता, न्याय, विवेक, बल, नेत्याचे नेतृत्व अनेक गुणांमुळे विचार क्रियेतून प्रगट झाले व समर्थ विचारांचे छत्रपतींसारखे गोब्राह्मण प्रतीपालक शुरवीर शककर्ते राजे निर्माण झाले.
समर्थांनी शैक्षणिकदृष्ट्या जे कार्य केले ते समाज बल वाढून अज्ञान मरगळता दूर करण्यासाठी केले. ज्या काळात समाजाला जे अपेक्षित होते. त्याचा त्यांनी स्वीकार केला. बुद्धीवर्धन करणाNया ह्या विचाराला शिक्षण म्हणतात. ही आजची शिक्षण व्याख्या समर्थांना अभिप्रेत नव्हती. शिक्षण म्हणजे व्यक्तीतील अज्ञान अंधःकाराचे निवारण. यामध्ये शील, विवेक, चारित्र्य, विनय, अध्यात्म, संस्कृती, मनाला सुयोग्य शिकवन यांचेही धडे दिले जात. शिक्षण भाषा, संस्कृती- स्थल- काल व बाह्यपरिवेश या पंचसुत्रीच्या आधारे दिले जावे. वास्तविक पाहता आजची शिक्षाप्रणाली कितपत सक्षम आहे. शिक्षण प्रदातेच कोणते विषय घ्यावेत कोणत्या वयात घ्यावेत याबाबत अज्ञानी व अकार्यक्षम आहेत असे खेदाने म्हणावेसे वाटते.
लैंगिक शिक्षणाबाबत अनेकदा वादळ निर्माण होत आहे जर दाताच संभ्रमात असेल तर विद्याथ्र्यांचे भवितव्य काय? आज पाश्चात्यांमध्ये गरज असल्याने लैंगिक शिक्षण तेथे निश्चित आवश्यक आहे. तथापी केवळ पाश्चात्यांचे अंधानुकरण करून हिंदू संस्कृती सभ्यतेला मूठमाती देवून अल्पवयातील अज्ञ शिक्षणापेक्षा विवाहपूर्व ‘ब्रह्मचर्य’ तत्वाचे शैक्षणिक स्तरावर प्रयत्न करण्याची सद्बुद्धी प्रशासक वर्गाला होत नाही. व्यक्ती पतन हे ओज, शुक्र यांच्या अत्याधिक ऱ्हासामुळे होते. आजही कुशल वक्ता दार्शनिक ओजपूर्ण आहेत. स्वामी विवेकानंद पहा, ओजाचा मूर्तीमंत पूतळा. ओजप्राप्त विचार लाखो-करोडो लोक जनसामान्यांवर अधिकार गाजवतात. ओजप्रधान तत्वे युगान् युगे टिवूâन राहतात.
त्रेता युगातील रामायण आजही सर्व सामान्यांत लोकप्रिय आहे. द्वापार तथा पूर्व कलीयुगातील विद्वानांचे विचारग्रंथ आजही दिपस्तंभासारखे मार्गदर्शक ठरत आहेत. ‘माझा स्वतःचा मुलगा मला आजकाल विचारत देखील नाही’ असे दुःखी विचार करणाऱ्या माता-पित्यांनी केलेले संस्कार व विर्यनाश पर्यायाने शरीरातील असंख्यातीत रोग. या सर्वांचे मुळ ब्रह्मचर्य (विवाहपूर्व) तथा विवाहोत्तर मर्यादित स्तरावरील संबंध ठेवणे हेच होय.
समर्थ विचारांचा मागोवा घेताना आधुनिक समस्यांचा विचार करणे आवश्यक आहे. समर्थांनी दुःखाचे मुख्य कारण मनाची मलिनता हे ओळखून अध्यात्माचे डोस पाजताना मनाला उत्तम मार्गदर्शन केले. अध्यात्म म्हणजे सगुण ध्यान हा विचार वैष्णव, शैव व शाक्त पंथातून वाढत असतानाच सगुण उपासने बरोबर हळूहळू मनोबोध करत करत अद्वैत स्थितीला पोहोचवणे ही समर्थांची विशेष खुबी होती.
काहीच न करता प्राणी । रामनाम जपे वाणी ।।
तेने संतुष्ट चक्रपाणी । भक्ता लागी सांभाळी ।।
असे सगुण उपासनेच नवविद्या भक्ता मार्गातून महत्व विषद करणारे स्वामीजी पुढे-पुढे
आत्मबुद्धी निश्चयाची । हीच दशा मोक्षश्रीची ।।
अहं आत्मा हे कधिची । विसरू नये ।।
अशा बोधातून अद्वैत वाद सामान्यांना समजावून देवू लागले.
समर्थ रामदास स्वामी प्रतिभासंपन्न कवी, राग रागिण्या तज्ञ गायक होते. अनेक तज्ञ गायकांना माहीत नसलेले अनेक राग समर्थांना येत होते. एखादे काव्य विशेष वृत्त, राग यामध्ये लिहीणे ही प्रतिभा प्राप्त कवीचेच कार्य असू शकते. ‘भूजंगप्रयात’ या बारा अक्षरी वृत्तामध्ये रात्री बारा ते चार वाजेपर्यंत दोनशे पाच दिव्य मनोबोधपर श्लोक व तेही वृत्तांमध्ये हे एक प्रतिभेची अलौकिक संपन्नता म्हणता येईल. सर्व श्लोक रचनेत भक्ती, ज्ञान, विवेक वर्तमान जीवन पद्धती, व्यवहारिक उपदेश, अध्यात्मातील गहन; परंतु साध्या व सुलभ भाषेतील मनोबोध सहज आकलन होत जातो. समर्थ भाषा ही अधिकाराची भाषा असे मला वाटते. हजारो ओव्यांमध्ये संत ज्ञानेश्वर माउलींची रचना सहज ओळखता येते; तशीच संत रामदास स्वामींची रचना एक वेगळे वैशिष्ट्य दाखवते. घन गंभीर व आदेशाने तेजप्रधान स्वामींची रचना पितृत्वाचा अधिकार दाखवतात तर आईच्या वत्सलतेने जगाला वंदनीय संत ज्ञानेश्वर माउलींची रचना स्नेह व तळमळ, कळकळ व मातृ अधिकार दाखवतात.
समर्थांचा एक एक विचार हा परिवर्तनशिल असून जीवन सुखमय बनवण्यास कारणीभूत ठरू शकतो. समर्थ पुराण, वेद यातील मुख्य गाभ्याला महत्व देतात. समर्थ बोध आधुनिक व वास्तववादी आहे. सहज उपदेश हा संतांचा स्थायीभाव तर अवजड काठिण्य हा तत्वदर्शिचा मार्ग असतो. प्रत्यक्ष क्रियेला कर्माला महत्व देवून साधना, शक्ती, कर्म, उपासना व सातत्याने प्रारब्ध देखील हतबल होते असे सांगणारे समर्थ समाजाचा विकासहेतू विभिन्न मार्गाचा अवलंबून करणारे संत होते. राष्ट्र विकास हा समाज विकास समाज संघटनावर आधारित असतो तर समाज व्यक्ती संघटन एवं विकासावर तर व्यक्ती ही मनाच्या सुदृढतेवर आधारित असते.
समर्थांनी मनाला उपदेश करताना भक्तीचे व त्यासोबत अध्यात्माचे गहन चिंतन केले आहे. ‘समर्थवाणी’ची एक ओळ एका मोठ्या गर्भित विषयाचा गाभा असू शकते. मनाचे श्लोक हा अध्यात्म व्यवहार जीवनाच्या विकासातील दिव्य सोपान आहे. समर्थ शब्दातच (सम् ± अर्थ) अर्थात प्रमाणातील निश्चित हेतू (उपयोगीता) असा अर्थ होतो. निश्चित उपयोगी जबाबदार वर्तन पद्धती म्हणजे समर्थ विचार अर्थात समर्थ वाणी.
।। इत्यलम् ।।
– डॉ. आनंद रावराणे
(प्रसिद्ध ता. शुक्रवार २४ एप्रिल २००९)