माजी सैनिक,पत्नी,पाल्यांसाठी विशेष गौरव पुरस्कार
सिंधुदुर्गनगरी (संतोष नाईक):– विविध क्षेत्रात अति उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, पाल्य यांना सैनिक कल्याण विभागाकडून विशेष गौरव पुरस्कार दिला जातो. एकरकमी रक्कम रुपये १० हजार व २५ हजार रुपये असे या पूरस्कारांचे स्वरुप आहे. यामध्ये राष्ट्रीय,राज्यस्तरीय खेळातील प्रमाणपत्रधारक, साहित्य, संगीत, गायन, वादन, नृत्य, नाट्य व इतर कला क्षेत्रात राष्ट्रीय, राज्यस्तरीय पुरस्कारधारक, पूर, जळीत,दरोडा,अपघात,नैसर्गिक आपत्ती (भूकंप,वादळ) मध्ये बहुमोल कामगिरी करणाऱ्या व्यक्ती,यशस्वी उद्योजकांचा पुरस्कार प्राप्त व्यक्ती, सामाजिक कार्य आणि पर्यावरणविषयक पुरस्कार प्राप्त व्यक्ती आणि शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये आय.आय.टी, आय.आय.एम,ए.आय.आय.एम. एस अशा नामवंत ख्यातीप्राप्त संस्थामध्ये प्रवेश मिळणाऱ्या तसेच इयत्ता 10 वी व 12 वी बोर्डाच्या परीक्षेमध्ये 90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी यांचा समावेश आहे.
तरी पात्र माजी सैनिक,पत्नी,पाल्य यांनी विशेष गौरव पुरस्कारासाठी दिनांक ३० सप्टेंबर २०२१ रोजी पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्याकडे आपले प्रस्ताव सादर करावे, या तारखेनंतर प्राप्त होणाऱ्या प्रकरणांचा विचार केला जाणार नाही. असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सिंधुदुर्ग ह्यांनी कळविले आहे.