`स्व’कर्मजन्य दोष नाहीसे झाल्यास जीवन सुखी होईल!
आमच्या आजवर १६ वर्ष वैदिक वास्तुशास्त्र/ डाउझिंग तथा अन्य वैदिक शास्त्रादि विषयांच्या अध्यापन काळात बहुत प्रकारादी गुणादी विचारांची विविधांगी विचारसरणीची अनेक व्यक्तीवलये भेटली. वस्तुतः ही संख्या काही हजारात आहे.
अनेकदा तुमच्या समस्या, दुःख ह्याला ग्रहदोष, (पत्रिकेतील दोष),वास्तु दोष, भुमीदोष वैगरे जबाबदार असतात. विशेषतः बरेचजण बहुधा सर्वजण विविध ज्योतिषी, वास्तुपंडीत यांच्याकडे जात असतात व समस्या निवारण करत असतात, परंतु कधीकधी अनेकानेक उपायांती समस्या जर सुटत नसेल तर तो कदाचित स्वकर्मजन्य दोष असू शकतो.
हा दोष
१) दुष्कर्मजन्य पाप
२) अविद्याजन्य पाप
३) पूर्व कर्मकृत्यादी पाप
या प्रकारात येतो.
यामध्ये
१) चुकीच्या सवयी अयोग्य वर्तन, व्यसन
२) धारणादी दोष
३) मानस दोष
४) चौर्य ( सोने , हिरे किंवा स्त्रियांच्या आभुषणाची चोरी
५) एखाद्याचा प्रामुख्याने स्त्रीचा मानसिक छळ
६) मारपिट
७) पैशाच्या आत्यधिक हव्यासापोटी केलेली दुष्कर्म व इतर अनेक
जोडोनिया धन उत्तम व्यवहारे। उदास विचारे वेच करी (संत तुकाराम महाराज)
धन योग्य मार्गाने कमावून चांगल्या प्रकारात खर्च करा. केवळ आत्यधिक स्वार्थ हेतुने धन संग्रहित करणारे, कुणालाही न देणारे, वासनादेहामुळे पुढे अनेक जन्म मुषक (उंदीर) बनून राहतात. ( ग. पु. सारोद्धार)
उंदीरांची संख्या जास्त का? हे वाचकांच्या ध्यानात एव्हाना आले असेलच! मित्रहो! गरजेनुसार स्वार्थ जरुर असावाच पण त्याच्या सीमारेषा निश्चित करा व ह्या नरदेहाचे परम कल्याण साधा असो!
याशिवाय १४ प्रकारचे दोष यामध्ये येतात. विषय व्याप्तीमुळे लेखन आवर घालत आहे,
स्वकर्मदोषातील व्यक्ती आपले दोष ह्याच जन्मात फेडत असल्यामुळे ते दोष कदाचित त्याच्या अपत्यांना पण भोगावे लागतात.
त्यामुळे आमच्याच कुटुंबात ही क्लिष्टता का? असा प्रश्न विचारणाऱ्या साधकांनी प्रथम स्वतःचे पूर्वायुष्याचे सिंहावलोकन करावे.
अशावेळी डाउझिंग अथवा अन्यप्रकारे निश्चित निदान करुन दोष कमी करावा किंवा प्रयत्न करावा.
केवळ कुंडली दोषादी हेच समस्येचे कारण असत नाही. तर त्यास अनेक कंगोरे आहेत.
वैदिक ( scientific) वास्तुशास्त्रात उपरिनिर्दिष्ट दोषा सोबतच इतर १४ दोषांचे विज्ञान व चिकित्सात्मक अभ्यास आहे, स्पंदन विषयाचा विशेष अभ्यास आहे.
वास्तुदोष मुळातच
२०% तत्वदोष
३०% बाह्यदोष
५०% स्पंदनातून होतो.
वैदिक वास्तुच्या चार लेव्हल पैकी ४ थ्या सुपर अेडव्हान्स कोर्स मध्ये अनेक गोष्टीवर मार्गदर्शन आहे
शासनमान्य संस्था पदवी कोर्स वैदिक वास्तु व डाउझिंग ( B.V.D.Sc./ B.V.V.Sc.) पदवी कोर्सेस सर्व भाषेत मुंबई पुणे, कोल्हापूर, नगर, कोकण येथे सुरु होत आहेत. आजवर १६ वर्षात हजारो भारतीय यशस्वी उत्तीर्ण झाले आहेत.
अधिक माहिती प्रवेश हेतू call/ what’s app 9323068873/9967513609/ 9867821727
द्वारा : भारतीय वैदिक विज्ञान संशोधन संस्था मुंबई®
विज्ञानयुगात विज्ञानवादी शास्त्रे शिकविणारी संशोधन प्रशिक्षण संस्था
– प्रा. डॉ. आनंदसर
जेष्ठ वैदिक वास्तु डाउझिंग प्रशिक्षक, मनोविज्ञान समुपदेशक, लेखक, समिक्षक