उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- शनिवार २१ ऑगस्ट २०२१
शनिवार दिनांक २१ ऑगस्ट २०२१
राष्ट्रीय मिती श्रावण- ३०
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- श्रावण शुक्ल पक्ष चतुर्दशी सायंकाळी १९ वाजेपर्यंत
नक्षत्र- श्रवण रात्री २० वाजून २१ मिनिटापर्यंत,
योग- सौभाग्य दुपारी १२ वाजून ५३ मिनिटापर्यंत
करण १- गरज सकाळी ०७ वाजून ५३ मिनिटापर्यंत नंतर विष्टि २२ ऑगस्टच्या सकाळी ६ वाजून १२ मिनिटापर्यंत
करण २- वणिज सायंकाळी १९ वाजेपर्यंत
चंद्रराशी- मकर अहोरात्र
सूर्योदय- सकाळी ०६ वाजून २३ मिनिटांनी तर
सूर्यास्त- सायंकाळी १९ वाजून ०२ मिनिटांनी आणि
चंद्रोदय- सायंकाळी १८ वाजून २७ मिनिटांनी होईल.
चंद्रास्त- पहाटे ४ वाजून ५९ मिनिटापर्यंत.
ओहोटी- पहाटे ४ वाजून ४६ मिनिटांनी आणि सायंकाळी १७ वाजून ४४ मिनिटांनी
भरती- सकाळी ११ वाजून २९ मिनिटे आणि रात्री २३ वाजून २१ मिनिटांनी
दिनविशेष:- आज आहे अश्वत्थ मारुती पूजन आणि ऋक श्रावणी
ऐतिहासिक दिनविशेष:
२१ ऑगस्ट रोजी झालेले जन्म.
१८७१ साली भारत सेवक समाजाचे एक संस्थापक सदस्य गोपाळ कृष्ण देवधर यांचा जन्म झाला.
‘भारत सेवक समाजा’च्या ज्ञानप्रकाश या दैनिकाचे व शेती आणि शेतकरी या नियतकालिकांचे संपादनकार्य त्यांनी केले. महात्मा गांधींनी सुरू केलेल्या अखिल भारतीय अस्पृश्यताविरोधी संघटनेचे ते प्रांतिक अध्यक्ष होते. त्यांनी केलेले सामाजिक कार्य आजही आदर्शवत आहे. विशुद्ध सेवाभावाने व राष्ट्रीय उद्धाराचे भान राखून आमरण लोकसेवा करणारा एक थोर भारत सेवक म्हणून देवधरांचे नाव अजरामर झाले.
१९१० साली जगप्रसिद्ध चित्रकार नारायण बेन्द्रे यांचा जन्म झाला.
१९५२ साली भारतातर्फे चीनमध्ये गेलेल्या पहिल्या सांस्कृतिक प्रतिनिधिमंडळामध्ये चित्रकार म्हणून नारायण बेंद्रें यांचा समावेश होता. “आर्ट सोसायटी ऑफ इंडिया’ चे तीन वर्षे अध्यक्ष होते. १९६९ मध्ये “पद्मश्री“ आणि १९९२ मध्ये “पद्मभूषण“, असे पुरस्कार देवून त्यांना भारत सरकारने सन्मानित केले होते.
१९२४ साली गणितज्ञ आणि कृषीशास्त्रज्ञ श्रीपाद दाभोळकर यांचा जन्म झाला.
श्रीपाद अच्युत दाभोळकर ऊर्फ मुकुंद दाभोळकर हे महाराष्ट्रातील प्रयोग परिवार या संकल्पनेचे प्रवर्तक आणि जमनालाल बजाज पुरस्काराचे मानकरी होते. दाभोळकर हे कोल्हापूरचे एक गणितज्ञ होते. ते कोल्हापूरजवळच्या गारगोटी महाविद्यालयात प्राध्यापक होते.
१९३४ साली महाराष्ट्राचे १३वे मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचा जन्म झाला.
२१ ऑगस्ट रोजी झालेले मृत्यू: –
दत्तात्रय बाळकृष्ण कालेलकर ऊर्फ काकासाहेब कालेलकर हे मराठी, गुजराती लेखक, इतिहासकार, गांधीवादी पत्रकार होते. आचार्य कालेलकर ऊर्फ काका कालेलकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. कालेलकरांचा जन्म इ.स. १८८५ साली महाराष्ट्रातील सावंतवाडीजवळच्या बेलगुंडी या गावी झाला. १९८१ साली गांधीवादी देशभक्त, शिक्षणतज्ञ काकासाहेब कालेलकर याचं निधन झाले.
१९९५: नोेबल पारितोषिक विजेते वैज्ञानिक सुब्रमण्यन चंद्रशेखर यांचे निधन झाले.
हे एक भारतीय व अमेरिकन शास्त्रज्ञ होते. आधुनिक खगोलशास्त्रात त्यांचे काम मुलभूत आणि महत्त्वाचे मानले जाते. ताऱ्यांच्या उत्पत्ती कशी होते ते चंद्रशेखरांनी शोधून काढले. या कामासाठी त्यांना १९८३ चे नोबेल पारितोषिक मिळाले. शिवाय त्यांना पद्मविभूषण, ब्रूस पदक व इतर अनेक पारितोषिके मिळाली.
२००६: भारतरत्न ख्यातनाम सनईवादक बिस्मिला खान यांचे निधन झाले. ते भारतातील प्रख्यात शहनाई वादक होते. त्यांचा जन्म डुमराव बिहारमध्ये झाला. सन् २००१ मध्ये त्यांना भारतातील सर्वोच्च सन्मान ‘भारतरत्न’ देऊन सन्मानित केले गेले. उस्ताद बिस्मिल्ला ख़ाँ हे भारतील तीसरे संगीतकार होते की ज्यांना भारतातील सर्वोच्च सन्मान ‘भारतरत्न’ देऊन सन्मानित केल्या गेले होते.