नामदार अ‍ॅड. अनिल परब यांच्या शुभहस्ते बालवाडी व सभागृहाचा लोकार्पण सोहळा!

नामदार अ‍ॅड. अनिल परब यांच्या शुभहस्ते बालवाडी व सभागृहाचा लोकार्पण सोहळा!

मुंबई, (प्रतिनिधी):- जोगेश्वरी (प), क्रांतीनगरमधील आदर्श बाळ विकास मंदिर पुनर्बांधणी झालेल्या बालवाडीचा व सार्वजनिक गणेशोत्सव खुल्या सभागृहाचा लोकार्पण सोहळा शिवसेनेचे विभाग प्रमुख, महाराष्ट्राचे परिवहन-संसदीय कार्यमंत्री डॉ. अ‍ॅड. अनिल परब यांच्या शुभहस्ते उद्या सायंकाळी पाच वाजता होणार आहे. यावेळी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य समितीच्या अध्यक्षा, नगरसेविका राजुलताई पटेल तसेच शिवसेनेचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेनेचे उपविभागप्रमुख-नगरसेवक राजू पेडणेकर यांनी केले आहे.