उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- गुरुवार दिनांक २३ सप्टेंबर २०२१

गुरुवार दिनांक २३ सप्टेंबर २०२१
राष्ट्रीय मिती आश्विन- ०१
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- भाद्रपद कृष्णपक्ष द्वितीया सकाळी ०६ वाजून ५३ मिनिटांपर्यंत
नक्षत्र- रेवती सकाळी ६ वाजून ४३ मिनिटांपर्यंत
योग- ध्रुव दुपारी १३ वाजून ४७ मिनिटांपर्यंत
करण १- गरज सकाळी ०६ वाजून ५३ मिनिटांपर्यंत
करण २- वणिज सायंकाळी १९ वाजून ३७ मिनिटांपर्यंत

चंद्रराशी- मीन सकाळी ०६ वाजून ४३ मिनिटांपर्यंत

सूर्योदय- सकाळी ०६ वाजून ३० मिनिटांनी तर
सूर्यास्त- सायंकाळी १८ वाजून ३२ मिनिटांनी होईल.

चंद्रोदय- रात्री २० वाजून १२ मिनिटांनी तर
चंद्रास्त- सकाळी ८ वाजून १८ मिनिटांनी होईल.

ओहोटी- सकाळी ७ वाजून ०५ मिनिटांनी आणि सायंकाळी १९ वाजून २२ मिनिटांनी तर
भरती- रात्री १ वाजून ०७ मिनिटांनी आणि दुपारी १३ वाजून १२ मिनिटांनी असेल.

दिनविशेष:- तृतीय श्राद्ध आणि भारतीय आश्विन मासारंभ,

त्याचप्रमाणे आज विषुव दिन आहे.
या दिवशी सूर्य खगोलीय विषुववृत्तावर असल्याने पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणी १२ तासांचा दिवस व १२ तासांची रात्र असते. म्हणून या दिवसांना विषुव-दिन असेही म्हणतात. या दिवशी सूर्य बरोबर पूर्वेस उगवतो व पश्र्चिमेस मावळतो.

ऐतिहासिक दिनविशेष:-
१८७३: साली महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
१८८४: साली महात्मा फुले यांचे सहकारी रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांनी बाँबे मिल हँड्‌स असोसिएशन ही गिरणी कामगार संघटना स्थापना करून संघटित कामगार चळवळीची सुरुवात केली.

जन्म:-
१९११: भारतीय भौतिकशास्त्रज्ञ राप्पल संगमेश्‍वर कृष्णन यांचा जन्म.
१९५०: डॉ. अभय बंग यांचा जन्म.
महाराष्ट्रभूषण पुरस्कार प्राप्त अभय बंग सर्च या संस्थेमार्फत गडचिरोलीतील ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा आणि संशोधन असे कार्य इ.स. १९८५ पासून करतात. बालमृत्यू नियंत्रणावरील त्यांच्या संशोधनाची दखल भारतासोबतच अनेक देशांनी घेतली असून पाकिस्तान, नेपाळ, बांग्लादेश व अनेक आफ्रिकन देश त्यानी तयार केलेले बालमृत्यू नियंत्रणाचे प्रतिरूप वापरतात.
१९५१: भारतीय आयुर्वेदिक चिकित्सक, एव्हीपी रिसर्च फाऊंडेशनचे संस्थापक, पी. आर. क्रिष्णा कुमार यांचा जन्म.
१९०८: देशभक्त व हिन्दी साहित्यिक रामधारी सिंह दिनकर यांचा जन्म.
१९१७: भारतीय रसायनशास्त्र आसिमा चॅटर्जी यांचा जन्म.
१९१९: पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, शिक्षणतज्ञ देवदत्त दाभोळकर यांचा जन्म.
१९२०: नाट्य लेखक व अभिनेते भालबा केळकर यांचा जन्म.

मृत्यू:-
१९६४: साली नाटककार भार्गवराव विठ्ठल ऊर्फ मामा वरेरकर यांचा मृत्यू.
१९९९: साली मराठी चित्रपट, जाहिरातपट निर्माते गिरीश घाणेकरयांचा मृत्यू.
२००४: साली शास्त्रज्ञ, अणुऊर्जा आयोगाचे ४ थे अध्यक्ष डॉ. राजा रामण्णा यांचा मृत्यू.
२०१२: साली जादूगार कांतिलाल गिरीधारीलाल ऊर्फ के. लाल यांचा मृत्यू.
२०१५: साली भारतीय संन्यासी आणि तत्त्वज्ञ दयानंद सरस्वती यांचा मृत्यू.