उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- शनिवार दिनांक २४ एप्रिल २०२१
शनिवार दिनांक २४ एप्रिल २०२१
राष्ट्रीय मिती वैशाख – ०४
श्री शालिवाहन शके १९४३
तिथी- चैत्र शुक्लपक्ष द्वादशी १९ वा. १७ मि. पर्यंत
नक्षत्र- पू. फाल्गुनी ०६ वा. २१ मि. पर्यंत, उ. फाल्गुनी २८ वा. २२ मि. पर्यंत
योग- ध्रुव ११ वा. ४१ मि. पर्यंत,
करण १- बव ०८ वा. ३७ मि. पर्यंत, कौलव २९ वा. ४८ मि. पर्यंत,
करण २-बालव १९ वा. १७ मि. पर्यंत
राशी- सिंह ११ वा. ५५ मि. पर्यंत
सूर्योदय- ०६ वाजून १७ मिनिटे
सूर्यास्त- १८ वाजून ५६ मिनिटे
भरती- ०९ वाजून ५७ मिनिटे, ओहोटी- ०३ वाजून ४६ मिनिटे
भरती- २२ वाजून १० मिनिटे, ओहोटी- १५ वाजून ५३ मिनिटे
दिनविशेष:- शनिप्रदोष, वामन जयंती
जागतिक प्रयोगशाळा-प्राणी दिन, भारतीय जलसंपत्ती दिन, जागतिक शिल्पकला दिन, भारतीय पंचायती राज दिन
१६७४: भोर-वाई प्रांतातील केंजळगड शिवाजी महाराजांनी स्वारी करून जिंकला.
१९९० – हबल दुर्बीणीचे प्रक्षेपण.
१९९३ – आय.आर.ए.ने लंडनच्या बिशप्सगेट भागात बॉम्बस्फोट घडवला.
१९९३: इंडियन एअरलाइन्सच्या फ्लाइट ४२७ या दिल्लीहून श्रीनगरला जाणाऱ्या विमानाचे अतिरेक्यांनी अपहरण केले. सर्व १४१ प्रवाशांची सुखरूप मुक्तता झाली.
२००५ : जगातला पहिला क्लोन केलेला कुत्रा जन्माला आला.
जन्म
१९७३ – सचिन तेंडुलकर, भारतीय क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
१९४२: नाट्यसंगीत, गायक आणि अभिनेते मास्टर दीनानाथ मंगेशकर
१९९४: उद्योगपती, किर्लोस्कर उद्योग समूहाचे आधारस्तंभ शंतनुराव किर्लोस्कर
२०११ – सत्य साईबाबा यांचे निधन