पंचांग आणि दिनविशेष- रविवार दिनांक २८ नोव्हेंबर २०२१

रविवार दिनांक २८ नोव्हेंबर २०२१
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- कार्तिक कृष्णपक्ष नवमी २९ नोव्हेंबरच्या पहाटे ५ वाजून ३० मिनिटांपर्यंत
नक्षत्र- पूर्वा फाल्गुनी रात्री २२ वाजून ४ मिनिटांपर्यंत
योग- विष्कंभ २९ नोव्हेंबरच्या पहाटे ५ वाजून ०१ मिनिटांपर्यंत

करण १- तैतिल सायंकाळी १७ वाजून ५० मिनिटांपर्यंत
करण २- गरज २९ नोव्हेंबरच्या पहाटे ५ वाजून ३० मिनिटांपर्यंत

चंद्रराशी- सिंह २९ नोव्हेंबरच्या पहाटे ४ वाजून ३ मिनिटांपर्यंत

सूर्योदय- सकाळी ०६ वाजून ५६ मिनिटांनी तर
सूर्यास्त- सायंकाळी १७ वाजून ५७ मिनिटांनी होईल

चंद्रोदय- रात्री ० वाजून ४१ मिनिटांनी
चंद्रास्त- दुपारी १३ वाजून ४२ मिनिटांनी

भरती- पहाटे ०५ वाजून ५० मिनिटांनी आणि सायंकाळी १८ वाजून ३२ मिनिटांनी
ओहोटी- दुपारी १२ वाजून ५२ मिनिटांनी

राहुकाळ- सायंकाळी १६ वाजून ३६ मिनिटांपासून सायंकाळी १७ वाजून ५९ मिनिटांपर्यंत आहे.

————
दिनविशेष:-

विद्येविना मती गेली ।
मतीविना नीती गेली ।
नीतीविना गती गेली ।
गतीविना वित्त गेले ।
वित्ताविना शूद्र खचले।
इतके अनर्थ एका अविद्येने केले।।

म्हणूनच गरीब, कष्टकरी, दुर्लक्षित बहुजन समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करणारे, महाराष्ट्रातील समाजसुधारकांच्या पहिल्या पिढीतील श्रेष्ठ समाजसुधारक आणि विशेषतः समाजातील श्रमजीवी वर्गाच्या शोषणाची व सामाजिक दास्याची मीमांसा करणारा क्रांतिकारक विचारवंत महात्मा जोतीराव फुले यांची आज पुण्यतिथी; त्यांना पाक्षिक स्टार वृत्त कडून विनम्र अभिवादन!

You cannot copy content of this page