उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- रविवार २९ ऑगस्ट २०२१

रविवार दिनांक २९ ऑगस्ट २०२१
राष्ट्रीय मिती भाद्रपद- ७
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- श्रावण कृष्णपक्ष सप्तमी रात्री २३ वाजून २४ मिनिटांपर्यंत
नक्षत्र- कृत्तिका अहोरात्र
योग- ध्रुव सकाळी ६ वाजून ४२ मिनिटांपर्यंत
करण १- विष्टि सकाळी १० वाजून ०८ मिनिटांपर्यंत
करण २- बव रात्री २३ वाजून २४ मिनिटांपर्यंत

चंद्रराशी- मेष सकाळी १० वाजून १८ मिनिटांपर्यंत

सूर्योदय- सकाळी ०६ वाजून २५ मिनिटांनी तर
सूर्यास्त- सायंकाळी १८ वाजून ५४ मिनिटांनी होईल.

चंद्रोदय- रात्री २३ वाजून १० मिनिटांनी आणि
चंद्रास्त- दुपारी १२ वाजून ०८ मिनिटांनी होईल.

ओहोटी- सकाळी ०९ वाजून ४६ मिनिटांनी आणि रात्री २२ वाजून १९ मिनिटांनी
भरती- पहाटे ४ वाजून ०३ मिनिटांनी आणि सायंकाळी १५ वाजून ४७ मिनिटांनी

दिनविशेष:- आज आहे भानू सप्तमी, आदित्य पूजन.

ऐतिहासिक दिनविशेष:

२९ ऑगस्ट रोजी झालेल्या घटना.

१८३१ साली मायकेल फॅरेडे याने विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचा शोध लावला. ते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ आणि रसायनशास्त्रज्ञ होते. त्याने विद्युतचुंबकत्व आणि विद्युत रसायनशास्त्र या विज्ञानाच्या शाखांमध्ये महत्त्वपूर्ण संशोधन केले.

१९४७ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली घटना समितीची स्थापन झाली.

२९ ऑगस्ट रोजी झालेले जन्म.

१८८० साली भारतीय स्वातंत्र्यसैनिक, लोकनायक बापूजी अणे अर्थात माधव श्रीहरी अणे,
१९०१ साली भारतातील सहकार चळवळीतील अग्रणी सहकारमहर्षी पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील,
१९०५ साली भारतीय हॉकीपटू मेजर ध्यानचंद,
१८८७ साली भारतीय डॉक्टर आणि राजकारणी जीवराज नारायण मेहता आणि
१९५८ साली अमेरिकन पॉप गायक, गीतलेखक, संगीतकार मायकेल जॅक्सन यांचा जन्म झाला.

२९ ऑगस्ट रोजी झालेले मृत्यू.

१९६९ साली लोकशाहीर मेहबूब हुसेन पटेल ऊर्फ शाहीर अमर शेख
२००७ साली स्वातंत्र्यसैनिक आणि हरयाणाचे मुख्यमंत्री बनारसीदास गुप्ता आणि
२००८ साली मराठी हिंदी चित्रपट अभिनेत्री जयश्री गडकर यांचे निधन झाले.

You cannot copy content of this page