उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- रविवार ५ सप्टेंबर २०२१
रविवार दिनांक ५ सप्टेंबर २०२१
राष्ट्रीय मिती भाद्रपद- १४
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- श्रावण कृष्णपक्ष त्रयोदशी सकाळी ८ वाजून २१ मिनिटांपर्यंत
नक्षत्र- आश्लेषा सायंकाळी १८ वाजून ०६ मिनिटांपर्यंत
योग- परिघ सकाळी ८ वाजून ३० मिनिटांपर्यंत
करण १- वणिज सकाळी ०८ वाजून २१ मिनिटांपर्यंत
करण २- विष्टि रात्री २० वाजून ०४ मिनिटांपर्यंत
चंद्रराशी- कर्क सायंकाळी १८ वाजून ०६ मिनिटांपर्यंत
सूर्योदय- सकाळी ०६ वाजून २७ मिनिटांनी तर
सूर्यास्त- सायंकाळी १८ वाजून ४८ मिनिटांनी होईल.
चंद्रोदय- पहाटे ४ वाजून ३३ मिनिटांनी तर
चंद्रास्त- सायंकाळी १८ वाजता होईल.
ओहोटी- पहाटे ४ वाजून ३१ मिनिटांनी आणि सायंकाळी १७ वाजून २२ मिनिटांनी
भरती- सकाळी ११ वाजून १४ मिनिटांनी आणि सायंकाळी २३ वाजून ०७ मिनिटांनी
दिनविशेष:- आज आहे शिवरात्री आणि आदित्य पूजन.
ऐतिहासिक दिनविशेष: शिक्षक दिन!
भारतरत्न, भारतीय तत्वज्ञ, भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती सर्वेपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म १८८८ साली दक्षिण भारतात तिरुत्तनी या ठिकाणी झाला. हे गाव चेन्नई शहरापासून ईशान्येला ६४ किमी अंतरावर आहे. १९५४ साली त्यांना ‘भारतरत्न’ हा किताब देऊन गौरविले गेले. शिक्षणाबद्दल डॉ. राधाकृष्णन यांना अतिशय जिव्हाळा होता. शिक्षण क्षेत्रात अधिकाधिक विकास घडून यावा यासाठी ते आयुष्यभर प्रयत्नशील होते. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे स्वतः एक उत्तम शिक्षक होते आणि शिक्षकी पेशाबद्दल त्यांना खूप प्रेम होते. त्यासाठी त्यांनी ४० वर्षे कार्य केले. त्यांच्या सन्मानार्थ ५ सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस ‘शिक्षकदिन’ म्हणून साजरा होतो.
१९१८ साली दानशूर उद्योगपती सर रतनजी टाटा यांचे निधन झाले. त्यांनी अनेक ऐतिहासिक वस्तू एकत्र केल्या होत्या. १९२३ मध्ये या वस्तू टाटांच्या कुटुंबियांनी प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालयाला दान केल्या.