दिल्लीसह सहा राज्यात वादळासह पावसामुळे ७१ लोक मृत्यूमुखी!
नवी दिल्ली:- दिल्लीसह सहा राज्यात झालेल्या जोरदार धुळीच्या वादळामुळे आणि मुसळधार पावसामुळे ७१ लोक मृत्युमुखी पडले आहेत; तर ५० पेक्षा अधिक लोक जखमी झाले असून मालमत्तेचेही प्रचंड नुकसान झालेले आहे.
सुमारे ११० की. मी. प्रती तास वादळी वाऱ्यामुळे शेकडो झाडे पडली. त्यामुळे घरांचे, वाहनांचे नुकसान झाले. वाहतुकीवर मोठा विपरीत परिणाम झाला.
हवामान खात्याने आजही जोरदार धुळीच्या वादळासह मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.