निसर्ग संपन्न परशुरामाची भूमी-चिपळूण

कोकणभूमी ही परशुरामाची भूमी म्हणून ओळखली जाते. चिपळूण हे शहर श्री परशुरामानी वसिवले आहे; अशी पुरातन कथा आहे. श्री परशुराम हे महेंद्रगिरी पर्वतावर राहत होते म्हणून ह्या पर्वताला परशुराम घाट म्हणून ओळखले जाऊ लागले. श्री परशुरामांनी आपल्या बाणांनी बाणगंगा तिर्थाची निर्मिती केली. महेंद्रगिरी पर्वतापासून थोड्या अंतरावर रामतीर्थ सरोवर आहे. श्री देवी विंध्यवासिनी मंदिर स्थापन केले.

डेरवण म्हणून अतिशय प्रसिद्ध ठिकाण येथे पहावयास मिळते. अतिशय निसर्गरम्य असे चिपळूण शहर आहे. परशुराम जयंती अक्षय तृतीयेला खूप आनंदात मोठ्या भक्तिभावाने साजरी केली जाते. हा दिवस साडेतीन मुहूर्ततील महत्वाचा एक मुहूर्त मानला जातो. इतिहास काळातील अनेक गोष्टी ह्या चिपळूण शहराशी निगडीत आहेत. अनेक प्राचीन मंदिरे, निसर्गरम्य डोंगर, नद्या, पर्वतांनी नटलेले सुंदर असे चिपळूण शहर आहे. चिपळूण शहरात शिमगा हा सण खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. मुंबईतील चाकरमानी हया सणाला हजेरी लावतात. ह्या दिवशी गावामध्ये घरोघरी देवाची पालखी नेली जाते. मुंबई गोवा मार्गावर चिपळूण हे शहर मध्यावर असल्यामुळे अनेक पर्यटक ह्या शहरात विश्रांती घेतात.

– नियतीवीरा कंटक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *