राज्य शिक्षण मंडळाचा बारावीचा ऑनलाईन निकाल उद्या जाहीर होणार
राज्यभरातून तब्बल १४ लाख ८५ हजार १३२ विद्यार्थी बारावीचे परीक्षार्थी!
पुणे: राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा ऑनलाईन निकाल बुधवारी दुपारी १ वाजता जाहीर होणार असल्याचे मंडळाने कळविले आहे. एसएमएसद्वारे निकाल पाहण्याची सोय करण्यात आली आहे. गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी ३१ मे ते ९ जून या कालावधीत अर्ज करता येणार आहे. पुनर्मूल्यांकनासाठी आधी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट २०१८ मध्ये घेण्यात येईल. राज्यभरातून तब्बल १४ लाख ८५ हजार १३२ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा असून त्यापैकी तीन लाख ३० हजार ८२३ विद्यार्थी मुंबई विभागातील आहेत. खालील संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता येईल.
१) www.mahresult.nic.in
२) ww.result.mkcl.org
३) www.maharashtraeducation.com
४) http://www.knowyourresult.com
५) hscresult.mkcl.org