विधानपरिषदेचे निकाल जाहीर; विलास पोतनीस, कपिल पाटील, निरंजन डावखरे विजयी
मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक आणि कोकण पदवीधर मतदारसंघ
विलास पोतनीस, कपिल पाटील, निरंजन डावखरे विजयी
नवी मुंबई:- मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक आणि कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील मतमोजणीनंतर खालीलप्रमाणे विजयी उमेदवारांची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी केली.
मुंबई पदवीधर –विजयी उमेदवार – विलास पोतनीस (मिळालेली मते १९३५४)
मुंबई शिक्षक –विजयी उमेदवार – कपिल पाटील (मिळालेली मते ४०५०)
कोकण पदवीधर –विजयी उमेदवार – निरंजन डावखरे (मिळालेली मते ३२८३१)
दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवार व त्यांची मते खालीलप्रमाणे
मुंबई पदवीधर – अमितकुमार मेहता (मिळालेली मते ७७९२)
मुंबई शिक्षक – शिवाजी शेंडगे (मिळालेली मते १७५४ )
कोकण पदवीधर – संजय मोरे (मिळालेली मते २४७०४ )
तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवार व त्यांची मते खालीलप्रमाणे
मुंबई पदवीधर – जालिंदर सरोदे (मिळालेली मते २४१४ )
मुंबई शिक्षक – अनिल देशमुख (मिळालेली मते ११४७)
कोकण पदवीधर – नजीब मुल्ला (मिळालेली मते १४८२१)
मुंबई शिक्षक मतदारसंघात ८३५३ मतदारांनी मतदान केले होते. त्याची टक्केवारी ८२.१३ आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघात ३७२३७ मतदारांनी मतदान केले होते. त्याची टक्केवारी ५२.८१ तर कोकण पदवीधर मतदारसंघात एकूण ७५४३९ मतदारांनी मतदान केले होते त्याची टक्केवारी ७२.३५ आहे.
या निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनद्वारे मतदान नव्हते तर एकल संक्रमणीय पद्धतीचे मतदान होते. म्हणजे मतदारास मतपत्रिकेवरील उमेदवारांना पेनाने पसंतीक्रम द्यावयाचे होते. यामध्ये उमेदवारासाठी विजयी होण्यासाठी एका विशिष्ट सूत्रानुसार कोटा निश्चित केला जातो तो मिळाल्यास उमेदवार विजयी घोषित केला जातो अन्यथा हा कोटा पूर्ण होईपर्यंत फेऱ्या घेण्यात येतात, यामध्ये सर्वात कमी मते मिळालेल्या उमेदवारांची मते प्रमुख उमेदवारांमध्ये पसंतीक्रमानुसार ट्रान्स्फर केली जातात. याला बाद फेरी म्हणतात. ज्याची मते ट्रान्स्फर होतात ते उमेदवार आपोआपच बाद ठरविले जातात.
मुंबई शिक्षकसाठी ३९५१ मतांचा कोटा ठरविण्यात आला होता. याठिकाणी ७९०० वैध मतदान होते. यात कपील पाटील यांना ४०५० मते बाद फेऱ्यांत मिळाली. कोकण पदवीधरसाठी ३५ हजार १४३ चा कोटा होता. याठिकाणी ७० हजार २८५ मतदान झाले होते. निरंजन डावखरे यांना २९ हजार ३५ मते तर नजीब मुल्ला यांना १४ हजार ६२५ आणि संजय मोरे यांना २३ हजार २५८ मते होती. याठिकाणी रिंगणात १४ उमेदवार होते. विजयासाठी आवश्यक कोटा कुणीच पूर्ण न केल्याने कमी मते मिळालेल्या ११ उमेदवारांची मते ट्रान्स्फर करण्यात आली त्यामुळे डावखरे २९ हजार २०१४, मुल्ला १४ हजार ८२१ आणि मोरे २४ हजार ७०४ अशी मतसंख्या वाढली.
तरी देखील प्रथम उमेदवारांनी विजयाचा कोटा पूर्ण न केल्याने तिसऱ्या क्रमांकावरील नजीब मुल्ला यांची मते ट्रान्स्फर करण्यात आली. यामध्ये १२६९ मते संजय मोरे यांना आणि ९८७ मते निरंजन डावखरे यांना मिळाली. यामुळे डावखरे यांची ३० हजार १९१ तर संजय मोरे यांची २४ हजार ७०४ मतसंख्या झाली.
यावरही कोटा पूर्ण न झाल्याने पहाटे ४.१५ वाजता दुसऱ्या क्रमांकावरील संजय मोरे यांची मते ट्रान्स्फर करण्यात आली यामुळे डावखरे यांच्या मतांचे मूल्य ३२ हजार ८३१ इतके झाले. आवश्यक तो ३५ हजार १४३ मतांचा कोटा ते पूर्ण करू शकले नसले तरी रिंगणातील उरलेले एकमेव उमेदवार म्हणून त्यांना निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी निवडणूक आयोगाच्या अनुमतीने विजयी घोषित केले.
विजयी उमेदवारांना त्यांच्या समर्थकांच्या जल्लोषात प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली. या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विभागीय आयुक्त डॉ. जगदीश पाटील, निरीक्षक आर आर जाधव तसेच सर्व जिल्हाधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी यांनी कुठलीही अडचण येऊ न देता ती पार पाडली. (‘महान्यूज’)