२२ मे, जैवविविधता दिवस- भविष्यात जीवसृष्टी सुरक्षिततेसाठी…

महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ – दृष्टीकोन व साध्य

सर्वांगिण विकासासाठी जैविक विविधता अतिशय काटेकोरपणाने जपणे मानवासाठी खडतर असले तरी त्यासाठी उचित नियोजन अत्यावश्यक निर्माण झाला आहे.

अनेक जैविक परिसंस्थांमध्ये असंतुलीतपणा निर्माण झाला आहे. तर कित्येक प्रजाती ह्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत; तर काही प्रजाती कायमच्या नष्ट झाल्या आहेत. जर एखादी प्रजाती कायमची नष्ट झाल्यास, प्रजातीचा होणारा ऱ्हास हा पुढील काळात भरुन काढणे केवळ अशक्य आहे. त्याचे पुनरुजीवन कदापीही करता येणार नाही व ही पोकळी कायमच आपल्या भविष्यात देखील अशीच राहील. परिसंस्थाचा प्रमाणाबाहेर झालेला ऱ्हास हा यावर अवलंबुन असलेल्या कित्येक लोकांचे जनजीवन नष्ट करण्यास कारणीभूत ठरतो. यातूनच जनुकीय संरचनेतील घडणारे बदल हे आगामी काळातील येणाऱ्या मोठया आपत्तीची नांदी ठरेल.

मोठ्या प्रमाणात होणाऱ्या अशाश्वत विकास कामांमुळे जैवविविधतेवर अयोग्य व विपरीत परिणाम होताना दिसून येत आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ योग्य समन्वय घडवून आणण्यास प्रयत्नशील आहेत. या सर्व कामांमध्ये सर्व समावेशक घटकांच्या सहभागाची आवश्यकता आहे. व यासाठी मंडळ विशिष्ट धोरण तयार करीत आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिक हा राज्यातील समृद्ध अशा जैवविविधता रक्षणाकरिता स्वयंसिद्ध झाला पाहिजे व या प्रकारच्या कामामध्ये सहभागी झाला पाहिजे. खरंतर महाराष्ट्रासाठी हे काही नवीन नाही. कारण छ. शिवाजी महाराजांनी जैवविविधतेच्या संदर्भातील वृक्षांचे संरक्षण व सांभाळ करण्याबाबत आपल्या आज्ञापत्रांमध्ये अनेक गोष्टी लिहून ठेवल्या आहेत. ही आज्ञापत्रे आपणास त्या अर्थाने अत्यंत महत्वाची आहेत व वृक्षांवर अगदी पुत्रवत प्रेम करण्यास सांगतात व तसे पाहिल्यास पूर्वीपेक्षा आताच्या काळातच याची सर्वाधिक गरज आहे.

महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ आपल्या सर्वांकडून आपल्या राज्यातील जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धन करण्याकरीता मदतीची अपेक्षा करीत आहे. आपणही आपल्या क्षमतेप्रमाणे सहाय्य करून आपले राज्य समृद्ध करण्याच्या दृष्टीने वाटचाल करावी.

महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ राज्यातील मंडळींच्या मदतीनेच सहकार्याने राज्यातील अनमोल असे वनस्पती व प्राणी वैविध्याचे संरक्षण करण्यास कटिबद्ध आहे. तसेच स्थानिक या संबंधातील परंपरा, देशी जनावरांचे वाण, त्या संबंधातील त्याचे पारंपारीक ज्ञान या सर्वांचे जतन करण्याचा प्रयत्न करणार आहे.

महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ लोक सहभागातून तयार होण्याच्या जैविक विविधता व्यवस्थापन समित्या ह्या गाव, तालुका व जिल्हा स्तरावर गठीत करण्यास सर्वतोपरी मदत करेल तसेच लोक जैवविविधता नोंदवही तयार करणे, व जैविक विविधतेने संपन्न असलेल्या क्षेत्राचा जैवविविधता वारसा स्थळ घोषित करण्याकरीता राज्य शासनाशी पाठपुरावा करेल.

जैवविविधता व दैनंदिन जीवनमानाशी निगडीत असलेल्या परंपरांना संरक्षण देण्याकरिता संबंधित मंडळींचे क्षमता संवर्धनाचा प्रयत्न करेल.

राज्यातील सर्वांगीण जैविक विविधतेच्या संरक्षणाकरीता दिर्घकाळाकरिता योजना विकसित करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *