`तिमिरातूनी तेजाकडे’ शैक्षणिक चळवळीला कोकणात उत्स्फूर्त प्रतिसाद!

रत्नागिरी (प्रतिनिधी):- उच्च विद्याविभूषित, शिक्षणतज्ञ, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र व मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार विभागात कनिष्ठ अनुवाद अधिकारी पदावर कार्यरत असणारे श्री. सत्यवान यशवंत रेडकर, निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा व्याख्यानांचे अर्धशतक पूर्ण केल्यानंतर रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी १८ डिसेंबर २०२१ पासून निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा व्याख्यानमाला घेत आहेत; त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. रत्नागिरी आणि राजापूर येथील काही छायाचित्र खालीलप्रमाणे आहेत.

सदर व्याख्यानांसाठी कोणतेही रजिस्ट्रेशन शुल्क असणार नाही; तसेच श्री. रेडकर सर व्याख्यानासाठी कोणतेही मानधन घेत नाहीत. व्याख्यानामुळे विद्यार्थी तसेच सर्व उपस्थित मंत्रमुग्ध होत आहेत. शासकीय कर्मचाऱ्यांचे गाव घडवण्यासाठी खेळीमेळीच्या वातावरणात व्याख्यानं संपन्न होत आहेत.