जेष्ठ संगीतोपचार तज्ञ मारुती साळुंखे यांना सृजनशील संगीतोपचार साधक पुरस्कार

मुंबई:- जेष्ठ संगीतोपचार तज्ञ मारुती साळुंखे यांना सृजनशील संगीतोपचार साधक पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. सदर पुरस्कार प्रसिद्ध उद्योगपती महेंद्र शिंदे यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला. सदर पुरस्कारासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून फक्त तीनच व्यक्तींची निवड करण्यात आली. पुरस्कार सोहळा सुप्रसिद्ध गायिका मा.सावनी शेंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

मारुती साळुंखे यांनी मानवाच्या विविध छोट्या मोठ्या आजारावर संगीताने उपचार करण्याच्या तंत्राला अवगत केले आहे. त्यात त्यांचे अनोखे संशोधन सुरु आहे. त्याचबरोबर मानवी मेंदूची भाषा आणि मानवी मेंदूवर संगीताचा परिणाम ह्याचा आधुनिक अभ्यासही मारुती साळुंखे यांनी केलेला आहे. त्यांच्या ह्या क्षेत्रातील आदर्शवत कार्याची पोचपावती म्हणून त्यांना सृजनशील संगीतोपचार साधक पुरस्कार देऊन सन्मानाने गौरविण्यात आले.

सन्मानिय मारुती साळुंखे यांना पाक्षिक `स्टार वृत्त’ परिवाराकडून मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!