स्वर्गात जायचा रस्ता जितका कठीण असतो तितकाच कोकणात जायचा रस्ता कठीण!
मुंबई:- “कोकण हा खरंच स्वर्ग आहे, कारण स्वर्गात जायचा रस्ता जितका कठीण असतो तितकाच कोकणात जायचा रस्ता कठीण आहे!” असं ‘पुष्पक विमान’ फेम मराठी अभिनेत्री गौरी किरणने एक व्हिडीओ शेअर करून म्हटलं आहे.
कोकणात जाणारा महामार्ग कधी होणार? हा नेहमीच प्रश्न असतो. ह्या प्रश्नाचे उत्तर ना राज्याचे मुख्यमंत्री देऊ शकत, ना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री! त्याचा संताप कोकणवासियांकडून नेहमीच व्यक्त होतो. आतातर मराठी अभिनेत्री गौरी किरणने मुंबई-गोवा हायवेची दूरवस्था दाखविणारा व्हिडीओ शेअर करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
View this post on Instagram