आर्थिक दुर्बल घटक व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्री- मॅट्रिक शिष्यवृत्ती!

सिंधुदुर्गनगरी दि.12 (जि.मा.का) : राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांसाठी असलेली शिष्यवृत्ती व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्री- मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी ३० नोव्हेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी केले आहे.

सन 2023-24 वर्षासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालय शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकासाठी असलेली शिष्यवृत्ती योजनेसाठी (NMMSS) राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल (NSP 2.0 (www.scholarships.gov.in वर नवीन आणि नूतनीकरण अर्जाच्या ऑनलाईन नोंदणी व अर्ज भरण्यास 1 ऑक्टोबर 2023 पासून सुरवात झाली आहे. नवीन आणि नूतनीकरण नोंदणीची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत NMMSS परीक्षा शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये निवड झालेल्या राज्यातील सर्व विद्यार्थ्यांनी 2023-24 शैक्षणिक वर्षाची इयत्ता 9 वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी नवीन अर्जदार म्हणून आणि इ.9 वी, इ.10 वी आणि इ.11 वी उत्तीर्ण झालेल्या शिष्यवृत्ती धारकांनी स्वत: ची नोंदणी आधार नुसार करावी. यापूर्वी शिष्यवृत्ती घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी दहावी, अकरावी आणि बारावीसाठी नूतनीकरण अर्जदार म्हणून स्वतःचे नूतनीकरण करावे.

केंद्र शासनाच्या अपंग व्यक्तीचे सक्षमीकरण विभाग (DEPWD) मार्फत राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल (NSP) व्दारे अपंग विद्यार्थ्यांसाठी प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती इयत्ता 9 वी आणि 10 वी शिष्यवृत्ती लागू केली आहे. NSP 2.0 विद्यार्थ्यांची नोंदणी 1 ऑक्टोबर 2023 पासून सुरू झाली आहे. या योजनचे तपशीत या विभागाच्या वेबसाइटवर www.depwd.gov.in आणि राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल www.scholarships.gov.in वर उपलब्ध आहेत. नोंदणी आणि अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे.

NMMSS साठी पात्रतेचे निकष:-

पालकाचे उत्पन्न रु 3,50,000 पेक्षा जास्त नसावे. उत्पन्नाचा दाखला हा सक्षम प्राधिकारी यांच्या सहीचा आवश्यक आहे. शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित (टप्पा अनुदान सह) शाळेतील विद्यार्थाना सदर योजना लागू आहे. केंद्रीय विद्यालय जवाहर नवोदय विद्यालय तसेच केंद्र / राज्य शासनाकडून वसतिगृहाची सवलत घेत असलेल्या शासकीय तसेच खाजगी विनाअनुदानित शाळेतील खाजगी अनुदानित सैनिकी शाळेतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अपात्र आहेत. इयत्ता 10 वी नंतर शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्याने व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेत असल्यास शिष्यवृत्तीसाठी अपात्र करण्यात येईल. इयत्ता 10 वी मध्ये सर्वसाधारण जनरत विद्यार्थ्यास 60 टक्केपेक्षा अधिक गुण अनुसूचित जाती / जमातीच्या विद्यार्थ्यास 5 टक्के सुट. इयत्ता 9 वी मधून 10 वी मध्ये गेलेले विद्यार्थी व 11 वी मधून 12 वी मध्ये गेलेले विद्यार्थी प्रथम प्रयत्नात पास होणे आवश्यक आहे. शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्याचे राष्ट्रीयकृत बँकेतील विद्यार्थ्याच्या नावाचे खाते असावे, संयुक्त खाते नसावे. शिवृत्ती पात्र विद्यार्थ्याचे आधार कार्ड असावे व विद्यार्थ्याच्या बँक खात्याशी आधार कार्ड संलग्न असावे. विद्यार्थ्यांची ज्या प्रवर्गातून निवड झाली आहे, त्या प्रवर्गातूनच शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरावा, व जात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेली विद्यार्थ्यांसाठी प्री-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी पात्रतेचे निकष

अनुदानित शाळांतील इयत्ता 9 वी व 10 वी च्या दिव्यांग विद्यार्थ्यांना CwDs प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती दिली जाते. विद्यार्थ्याचे दिव्यांगत्वाचे प्रमाण 40 टक्के किंवा जास्त असावे, सक्षम अधिकान्याचे दिव्यांगत्वाचे वैध प्रमाणपत्र हे Rights of Persons with Disabilities Act 2016 मध्ये निकषानुसार असावे. एकाच पाल्यांच्या 2 पेक्षा अधिक अक्षम दिव्यांग पाल्यांना ही शिष्यवृत्ती लागू नाही. मात्र दुसरे अपत्य जुळे असल्यास त्यांना सदर शिष्यवृत्तीचा लाभ देता येईल. शिष्यवृत्ती एका इयत्तेला एका शैक्षणिक वर्षासाठीच लागु राहील. विद्यार्थ्याने तीच इयत्ता रिपीट केल्यास या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार नाही. विद्यार्थी नियमित असावा. जर विद्यार्थ्याला एकापेक्षा जास्त शिष्यवृत्ती लागू होत असतील तर विद्यार्थ्याने त्याच्या सोयीनुसार लाभाची लाभदायी शिष्यवृत्ती स्विकारुन दुसरी शिष्यवृत्ती वरिष्ठ कार्यालयास कळवून रद्द करवून घ्यावी. मात्र विद्‌यार्थी निवास निवासासाठी देय अनुदान, किंवा अशा प्रकारची राज्यशासनाची किंवा इतर स्त्रोतांकडून पुस्तके किंवा इतर शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी प्राप्त मदत स्विकारु शकतात. शिष्यवृत्ती धारक जर केंद्रशासनाच्या किंवा राज्यशासनाच्या अर्थसहाय्यित परीक्षा केंद्रावर प्रशिक्षण घेत असतील तर ही शिष्यवृत्ती सदर कालावधीसाठी बंद राहील. पालकांचे उत्पन्नाचा सर्व स्त्रोतातून प्राप्त वार्षिक उत्पन्न रु. 2,50,00 पेक्षा जास्त नसावे.

शिष्यवृत्ती रक्कम :- (NMMSS) साठी वार्षिक 12000 रुपये, दिव्यांग विद्यार्थांसाठी असलेली विद्यार्थ्यांसाठी प्री- मॅट्रिक शिष्यवृत्ती वार्षिक 9000 ते 14600 रुपये इतकी आहे. दोन्ही योजनांसाठी पात्र लाभार्थ्यांनी विहित कालावधीत ऑनालाईन अर्ज सादर करावेत.