सन १९९९ ते २०१७ पर्यंत १ लाख २९ हजार ७४१ रक्तदान!

‘श्री अनिरुद्ध उपासना फाउंडेशन’ व संलग्नित संस्था आयोजित
राज्यात अनेक ठिकाणी आज महा रक्तदान शिबीर

‘दिलासा मेडिकल ट्रस्ट अ‍ॅण्ड रिहॅबिलिटेशन सेंटर’, ‘अनिरुद्धाज्‌ अकॅडमी ऑफ डिजास्टर मॅनेजमेंट’ आणि ‘श्री अनिरुद्ध उपासना फाउंडेशन’ या संस्थांतर्फे श्रीहरिगुरूग्राम येथे रविवारी म्हणजेच दिनांक २२ एप्रिल २०१८ रोजी राज्यात अनेक ठिकाणी महा रक्तदान शिबीर आयोजित केलेले आहे.

हे भव्य रक्तदान शिबिर सर्व श्रद्धावानांचा उदंड अशा प्रतिसादाने यशस्वी होणार आहे. परमपूज्य अनिरुद्धांचे सर्व श्रद्धावान मित्र या रक्तदान शिबिरात सहभागी होऊन रक्तदानासारखे सर्वश्रेष्ठ दान नक्कीच यशस्वी करतील.

डॉ. अनिरुद्धांच्या म्हणजेच आपल्या सगळ्यांच्या लाडक्या सद्‌गुरू अनिरुद्धांच्या मार्गदर्शनानुसार सन १९९९ पासून रक्तदान शिबीर (ब्लड डोनेशन कॅम्प) आयोजित केले जाते व त्यास श्रद्धावानांनकडून व त्याचप्रमाणे संस्थेच्या हितचिंतकांकडून उचित प्रतिसाद मिळतो व त्यामुळे अनेक गरजू रुग्णांना ह्या रक्तदान शिबीरांचा फायदा होतो. ह्या रक्तदान शिबीरात राज्यातील अनेक रक्तपेढ्या सहभागी होतात.

दरवर्षी या उपक्रमाला अनुसरून मुंबईतील सर्व अनिरुद्ध उपासना केंद्र एकत्र येऊन एप्रिल महिन्यात भव्य रक्तदान शिबीर (Mega Blood Donation Camp) आयोजित करतात.

उन्हाळ्यात साधारण एप्रिल-मे महिन्यात, हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेंसाठी रक्ताची फारच निकड असते व रक्तदात्यांचा ही तुटवडा जाणवतो. हे लक्षात घेऊन श्रद्धावान ह्या रक्तदान शिबीरात हिरीरीने सहभागी होतात.

या वर्षी वरील संस्थेतर्फे महा रक्तदान शिबीर (Mega Blood Donation Camp) दिनांक २२ एप्रिल रोजी New English High School, Bandra येथे सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे.

या निमित्ताने आजपर्यंत झालेल्या महा रक्तदान शिबीराचा आलेख आपल्या सर्वांसमोर देत आहोत. सन १९९९ ते २०१७ पर्यंत श्रद्धावानांनी महा रक्तदान शिबीरात केलेले रक्तदान १ लाख २९ हजार ७४१ इतके आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *