अंकुश डामरे यांच्या सामाजिक कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आमची वाटचाल! – चेअरमन भगवान लोके
कणकवली:- “असलदे सोसायटीचे माजी चेअरमन अंकुश डामरे यांनी लावलेल्या संस्थारुपी रोपट्याचे आता वटवृक्षात रुपांतर होत आहे. त्यांनी या संस्थेसाठी आणि गावासाठी दिलेले योगदान आम्ही कदापी विसरु शकणार नाही. त्यांनी चेअरमन व विविध पदांवर कार्यरत असताना गावाच्या प्रगतीसाठी प्रामाणिक प्रयत्न केले . अंकुश डामरे यांच्या सामाजिक कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पुढील काळात आमची वाटचाल असेल!” असे प्रतिपादन सोसायटी चेअरमन भगवान लोके यांनी केले.
असलदे रामेश्वर विविध कार्यकारी सहकारी सोसायटी मासिक सभा चेअरमन भगवान लोके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी असलदे सोसायटी व ग्रामस्थांच्यावतीने असलदे सोसायटीचे माजी चेअरमन, माजी सरपंच, नांदगांव पंचक्रोशीत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अंकुश डामरे यांचे नुकतेच निधन झाल्याने शोक व्यक्त करण्यात आला. तसेच सोसायटी संचालक अनंत तांबे यांचे निधन झाले. त्याबद्दल सोसायटी संचालक व ग्रामस्थांच्या उपस्थितीत श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी व्हाईस चेअरमन दयानंद हडकर , उपसरपंच सचिन परब, माजी चेअरमन प्रकाश परब, सोसायटी संचालक शत्रुघ्न डामरे, परशुराम परब, शामराव परब, विठ्ठल खरात, माजी तंटामुक्त अध्यक्ष बाबाजी शिंदे, विनायक परब, दिनेश शिंदे, प्रविण डगरे, उत्तम नरे, रघुनाथ लोके, भालचंद्र लोके, मधुसुदन परब, सचिन हरमलकर, मनोज लोके, प्रविण डामरे, संतोष घाडी, तुषार घाडी, विजय डामरे, अनिल लोके, प्रकाश डामरे , गणेश डामरे, एकनाथ डामरे, संतोष डामरे, रामचंद्र डामरे, सदाशिव डामरे, भास्कर मालवणकर, प्रशांत लोके, वासुदेव दळवी, विजय परब, गुरुनाथ हडकर, भरत डामरे, जयवंत लोके, बाबू वाळके, सत्यवान घाडी, सोसायटी सचिव अजय गोसावी, लिपिक गौरी लोके आदींसह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.