९ फेब्रुवारीला भवानीमाता क्रिडांगण, हिंदमाता, दादर (पूर्व) येथे सद्गुरु अनिरुद्ध गुणसंकिर्तन सोहळा व पादुका दर्शन सोहळा!
मुंबई:- रविवार ९ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता भवानीमाता क्रिडांगण, शिवनेरी सेवा मंडळ कार्यालयाजवळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, शिंदेवाडी, हिंदमाता, दादर (पूर्व) येथे सद्गुरु अनिरुद्ध गुणसंकिर्तन सोहळा, सद्गुरु पादुका दर्शन व आरती होणार असून त्यावेळी सर्व श्रद्धावानांनी उपस्थित राहावे, आवाहन असे सद्गुरू श्री अनिरुद्ध उपासना केंद्र परळ शिरोडकर, परळ व्हिलेज व काळाचौकी यांच्यावतीने करण्यात आले आहे. यावेळी अध्यात्माचे गाढे अभ्यासक, लेखक, श्रीसाई भक्त, श्रद्धावान श्री. सदानंदसिंह वर्तक सद्गुरु अनिरुद्ध गुणसंकिर्तन करणार आहेत.
कलियुगातील सर्वसामान्य माणसांना दिलासा
“मी तुमच्यातलाच एक आहे” असं स्वत:बद्द्ल परमपूज्य बापू म्हणतात, पण हेच तर त्यांचं वेगळेपण आहे. एक कुटुंबवत्सल आणि सर्वांशी मित्रत्वाच्या नात्याने स्वत:ला बांधून घेणारा आहे. सर्वांवर निरामय प्रेम करणारा असा हा अनन्यप्रेमस्वरूप मित्र. प्रत्येकाला आनंदी झालेलं पहाण्यात आनंद मानणारा हा कृपासिंधू! करोडो लोकांना हाच आपला मायबाप अशी प्रचिती देणारा हा वरदहस्त ! तो दगा न देणारा मित्र तर आहेच पण सदगुरुच्याही भूमिकेतून मन:सामर्थ्य पुरविणारा असा मन:सामर्थ्यदाता सुद्धा आहे. लोकांना दीपस्तंभासारखा योग्यमार्ग दाखविणारा हा पापतापनिवारक सामर्थ्यसिंधु! प्रत्येक मानवी जीवाचे विचारस्वातंत्र्य व कर्मस्वातंत्र्य पूर्णपणे मान्य करूनही (Common interest of common man ) तितक्याच ताकदीने त्यांची संकटे लीलया दूर करणारा हा महाबलोत्कट!
म्हणूनच श्रीअनिरुद्ध ठामपणे आपल्या सर्व श्रद्धावानांना दिलासा देणारा संकल्प पाळण्यास कटिबद्ध असतात. त्यासाठीच “तू आणि मी मिळून शक्य नाही असं ह्या जगात काहीच नाही” हे त्यांचे वचन त्यांच्या जीवनकार्याचे (His mission) संपूर्ण सार आहे.
संपूर्ण विश्व आज विनाशाच्या दिशेने कूच करीत आहे. अखिल मानवसमाज ज्या प्रगतीच्या उंच कड्यावर आज उभी आहे. तिथून थोडा जरी तोल गेला तरी ही संपू्र्ण मानवसमाज विनाशाच्या खोल गर्तेत (दरीत) कोसळून रसातळाला जाणार हे नक्की! अशावेळी सत्य, प्रेम, आणि आनंद ह्या जीवनमूल्यांच्या त्रिसूत्रीला पायाभूत मानून व पावित्र्य हेच प्रमाण ह्या मूलतत्त्वाचा अंगिकार करून अज्ञानाचा अंध:कार दूर करण्याचे ध्येय श्रीअनिरुद्धांनी प्रत्येक श्वासागणिक प्रत्येक कृतीतून कार्यातून जोपासले आहे.
धर्मक्षेत्राचे कुरुक्षेत्र होऊ नये म्हणून …
आज श्रीअनिरुद्धांचा जो कृतनिश्चय आहे, त्याप्रमाणे धर्मक्षेत्राचे कुरुक्षेत्र होऊ नये ह्या तत्वानेच त्यांना जे करायचं आहे ते जीवनकार्य ते समर्थपणे पुढे नेत आहेत.
मर्यादाधर्म संस्थापन
“अवघाचि संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोकी’ ह्या ओळी सार्थ करण्याच्या दृष्टीने धर्म, अर्थ, काम, मोक्ष ह्या पुरुषार्थाच्या जोडीला “भक्ती” ह्या पंचम पुरुषार्थाची जोड हवीच हे पटवून देऊन “मर्यादा” हा सहावा पुरुषार्थ अत्यंत आवश्यक कसा हे त्यांनी स्पष्ट केले आणि ह्या सहा पुरुषार्थांच्या सहाय्याने देवयान पंथावर चालण्यासाठी श्रद्धावानांना प्रवृत्त केले. त्यासाठी त्यांनी १) सत्यप्रवेश २) प्रेमप्रवास ३) आनंदसाधना हे तीन पुरुषार्थग्रंथाचे लेखन करून ते प्रकाशित केले. आज ह्या तीन ग्रंथराजांच्या आधारे सामान्य श्रद्धावान आपल्या जीवनाचा समग्र विकास घडवून आणू शकतो. समग्रजीवन विकासाचे सूत्र साधायची कला सामान्य भक्तांना शिकविण्यासाठी समर्थ आधार बनण्याचे ब्रीद त्यांनी अंगिकारले.
परमपूज्य सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंच्या संकल्पनेतून गेली २८ वर्षे अनेक भक्तिमय सेवा, आध्यात्मिक कार्य, सामाजिक कार्य, वैद्यकीय शिबिरं, रक्तदान शिबिरं आयोजित केली जातात. तर आधुनिक तंत्रज्ञान- विज्ञान स्वीकारून वैदिक सनातन धर्माची आधुनिक पायाभरणी केली जात आहे. अशा परमपूज्य सद्गुरू श्री अनिरुद्ध गुणसंकिर्तन श्रवण करण्याची पर्वणी दादर पूर्व विभागात पहिल्यांदाच मिळणार आहे.