कर्नाटकात भाजपा सर्वात मोठा पक्ष, पण बहुमत नाही!
भाजपाचा आणि काँग्रेस पक्षाचा पाठिंबा घेत जेडीएसचा सत्ता स्थापनेचा दावा!
नवीदिल्ली:- कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपाने चांगले यश संपादन करीत १०४ जागा जिंकल्या. तर अपयश आल्याने काँग्रेस पक्ष भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी प्रादेशिक पक्ष जेडीएसला पाठींबा देणार आहे. काँग्रेसचे मुख्यमंत्री सिद्धरामैया यांना स्वत:च्या मतदार संघात पराभवाला सामोरे जावं लागलं; हा काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्काच आहे.
काँग्रेस पक्षाला ७८ जागा आणि जेडीएसला ३८ जागा मिळविता आल्या. बहुमताचा ११३ हा आकडा कोणालाही मिळविता आला नाही. त्यामुळे आणखी एका राज्यात सत्ता स्थापनेचे स्वप्न भाजपाला साकारताना अनेक कसरती कराव्या लागणार आहेत.
सत्ता स्थापनेचा दावा भाजपाने आणि काँग्रेस पक्षाचा पाठिंबा घेत जेडीएसने राज्यपालांकडे केला असून पुढील दोन तीन दिवसात राजकारणातल्या घोडे बाजाराला तेजी आल्याचे कर्नाटकात दिसून येईल.
भाजपा-१०४, काँग्रेस-७८, जेडीएस्- ३८, इतर-२.
महाराष्ट्र एकीकरण समितीला एकही जागा नाही!
तर महाराष्ट्र एकीकरण समितीला हरविण्यासाठी राजकीय पक्षांनी केलेली व्युहरचना यशस्वी झाली. त्यामुळे कर्नाटकच्या विधानसभेत सीमाभागातील मराठी माणसांचा आवाज उठणार नाही. सीमाभागातील मराठी माणसांचे हे अपयश त्यांच्या चळवळीला मारक ठरू नये, एवढीच अपेक्षा!
भाजपा-१०४, काँग्रेस-७८, जेडीएस्- ३८, इतर-२.
ठाकरे बंधुना ‘एव्हीएम्’वर शंका!
पोटनिवडणुकीत भाजपाचा पराभव होतो आणि सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भाजपाला यश मिळते; यामुळे शंका घ्यायला वाव मिळतो. म्हणूनच भाजपाने बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन शंका दूर करावी; असा मर्मभेदी टोला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.
तर दुसरीकडे मनसेचे प्रमुख राज ठाकरेंनीही या निकालांवर शंका निर्माण करून ‘इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सचा विजय असो’, अशी खोचक प्रतिक्रिया ट्वीट केली आहे.
*