वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांच्यासह १०० डॉक्टरांचे पथक केरळकडे

मुंबई:- केरळ पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. पूरग्रस्तांना आरोग्यसेवा देण्यासाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांच्या नेतृत्वाखाली १०० डॉक्टरांचे पथक आज सकाळीच केरळकडे रवाना झाले आहे.

या चमूमध्ये जे. जे. रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉक्टर श्रीनिवास चव्हाण यांच्या मार्गदर्शनात ५० डॉक्टर, तर ससून रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉक्टर गजानन भारती यांच्या मार्गदर्शनात २६ डॉक्टर, इतर स्वयंसेवक व सहायकांसह १०० व्यक्तींचे पथक वैद्यकीय सहायता पुरविणार आहे. यात सर्जरी, मेडीसीन, बालरोग, स्त्रीरोग, प्रिव्हेंटिव्ह आणि सोशल मेडीसीनच्या तज्ज्ञांचा समावेश आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासनातर्फे २० कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा यापूर्वीच केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार केरळ पूरग्रस्तांसाठी मंत्रालय नियंत्रण कक्षातून सातत्याने माहिती देण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *