येरवड्यातील तारकेश्वर मंदिराच्या पायथ्याला महाशिवरात्रीनिमित्त  खिचडी वाटपाचे आयोजन

येरवडा:- शिवसेना वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाच्यावतीने येरवड्यातील तारकेश्वर मंदिराच्या पायथ्याला महाशिवरात्रीनिमित्त  खिचडी वाटपाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे उद्घाटन शिवसेनेच्या उपनेत्या तथा विधानपरिषदेच्या प्रतोद आमदार डॉ. निलम गो-हे यांच्या हस्ते करण्यात आले. सोमवारी महाशिवरात्रीनिमित्त  सकाळी १० ते रात्री १० दरम्यान तारकेश्वराच्या दर्शनासाठी आलेल्या लाखो भाविकांनी खिचडी प्रसादाचा लाभ घेतला. शिवसेना उपशहरप्रमुख आनंद गोयल हे महाशिवरात्रीला मागील दहा वर्षांपासून अविरतपणे खिचडी वाटप कार्यक्रमाचे आयोजन करतात.

या उपक्रमादरम्यान आमदार जगदीश मुळीक, शिवसेना उपनेते डॉ. रघुनाथ कुचिक, संपर्कप्रमुख बाळा कदम, शहरप्रमुख महादेव बाबर, चंद्रकांत मोकाटे, अजय भोसले, गटनेते संजय भोसले,  नगरसेवक बाळा ओसवाल, अनिल (बॉबी) टिंगरे, नगरसेविका पल्लवी जावळे, अशोक हरणावळ, सागर माळकर, राजाभाऊ चौधरी, सचिन खांदवे, एड. नाना नलावडे, सीमा अगरवाल,कविता आंब्रे, अमृता पठारे आदी मान्यवरांनी खिचडीचे शिवभक्तांना वाटप केले. मतदारसंघातील शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिकांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *