आमदार डॉ. भारतीताई लवेकर यांच्याकडून गार्डन व ओपन जिमनेशियमच्या कामाचा शुभारंभ
मुंबई:- वर्सोवा विधानसभेच्या आमदार डॉ. भारतीताई लवेकर यांच्या शुभहस्ते जोगेश्वरी (प.) पाटलीपुत्र नगर येथील कॉस्मोपॉलीटन को. आॅ. हौ. सोसायटीमधील गार्डन व ओपन जिमनेशियमच्या कामाचा शुभारंभ १४ जुलै २०१९ रोजी सकाळी ११ वा. संपन्न झाला. सोसायटीमधील सदस्यांच्या मागणीनुसार आमदार डॉ. भारतीताई लवेकर यांनी आपल्या आमदार फंडातून निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे सोसायटीतील सदस्यांनी आमदार डॉ. भारतीताई लवेकर यांचे आभार मानले. यावेळी सोसायटीचे सर्व पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.