कै.श्रीधर नाईक यांचा समाजसेवेचा वारसा नाईक कुटुंबियांनी जपला! -खा. विनायक राऊत
कणकवलीत कै. श्रीधर नाईक यांचा २९ वा स्मृतिदिन साजरा – ८० रक्तदात्यांनी केले रक्तदान
कणकवली (संतोष नाईक):- “कै. श्रीधर नाईक हे दानशूर आणि परोपकारी व्यक्तिमत्व होते. त्यांनी आपल्या सामाजिक कार्यातून तरुणांची एक फळी निर्माण केली होती. ते जनसामान्यात इतके लोकप्रिय होते की आजही सिंधुदुर्गात त्यांचे नाव आवर्जून घेतले जाते. मात्र काही अपप्रवृत्तीच्या लोकांनी त्यांची हत्या केली आणि परोपकारी वृत्तीचा व्यक्ती आपल्यातून निघून गेली. त्यांची हत्या जरी केली असली तरी त्यांचे विचार मात्र अजूनही जीवंत आहेत. ते विचार जोपासून आमदार वैभव नाईक, नगरसेवक सुशांत नाईक तसेच नाईक कुटुंबियांनी समाजसेवेचा वारसा कायम ठेवला आहे. अशाप्रकारे सामाजिक काम यापुढेही त्यांनी सुरु ठेवावे!” असे प्रतिपादन कै.श्रीधर नाईक यांच्या स्मृतीदिनी खासदार विनायक राऊत यांनी केले.
कै .श्रीधर नाईक यांचा २९ वा स्मृतिदिन आज संपन्न झाला. प्रथमतः नरडवे नाका येथील कै श्रीधर नाईक यांच्या पुतळ्यास खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर कणकवली कॉलेजच्या एचपीसीएल सभागृहात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. यानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात ८० रक्तदात्यांनी रक्तदान केले.
श्रीधर नाईक हे समाजसेवेतील अग्रणी नाव! -संदेश पारकर
याप्रसंगी संदेश पारकर म्हणाले, “राजकारणात अनेक बदल घडत असतात. श्रीधर नाईक व कै.विजय नाईक यांनी त्यावेळी राजकारणात बदल घडवत भक्कम संघटना निर्माण केली होती. श्रीधर नाईक हे समाजसेवेतील अग्रणी नाव होते. त्यांचा हा अश्वमेध थांबवावा, या हेतूने काही अपप्रवृत्तींच्या लोकांकडून श्रीधर नाईक यांची हत्या करण्यात आली. त्यांच्या जाण्याने पोकळी निर्माण झाली आहे. हे दुःख एका कुटुंबाचे नसून ते समाजाचे दुःख आहे. सिंधुदुर्गातील जनतेने या प्रवृत्तीला विरोध केला आहे.” असे सांगत त्यांनी अभिवादन केले.
श्रीधर नाईक यांचा सामाजिक कार्याचा वारसा जपा! -जेष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर
यावेळी जेष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते अशोक करंबेळकर म्हणाले, “कै. श्रीधर नाईक पक्ष विरहित काम करणारा कार्यकर्ता होता. सामाजिक क्षेत्रात त्यांच्या कार्यामुळे त्याची अजात क्षत्रू म्हणून ओळख होती. राजकीय चळवळीत सक्रिय सहभागामुळे त्यांचे वरिष्ठ पातळीवर राजकीय नेत्यांशी चांगले संबंध होते. समाजासाठी त्यांनी केलेले काम विचारात घेऊन त्यांच्या सामाजिक कार्याचा वारसा असाच जपणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल!”
श्रीधर नाईक यांनी युवा वर्गाची ताकद उभी केली! -आ. वैभव नाईक
श्रद्धांजली वाहताना आ. वैभव नाईक म्हणाले, “कै. श्रीधर नाईक यांनी आपल्याला मिळणाऱ्या उत्पन्नातील काही वाटा समाजाच्या हितासाठी खर्ची करत एक युवा वर्गाची ताकद उभी केली होती. त्यांच्या कामाची दखल सर्वांनीच घेतली होती. त्यांचे हे समाजव्रताचे कार्य असेच अविरत चालू ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत!” दादा कुडतरकर यांनीही आपले विचार मांडत श्रद्धांजली वाहिली.
यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, जि. प. सदस्य अमरसेन सावंत, कुडाळ पंचायत समिती उपसभापती जयभारत पालव, बाळा भिसे, दादा कुडतरकर, डॉ. तुळशीदास रावराणे, मुरलीधर नाईक, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, नीलम पालव, शैलेश भोगले, शेखर राणे, नगरसेवक कन्हैया पारकर, रुपेश नार्वेकर, सुशांत नाईक, सतीश नाईक, संकेत नाईक, योगेश मुंज, भूषण परूळेकर, राजू राणे, प्रतीक्षा साटम, विजय पारकर, भास्कर राणे, प्रसाद अंधारी, विलास कोरगावकर, भिवा परब, निसार शेख, दया बांदेकर, प्रमोद कावले, अंबाजी सावंत, संजय ढेकणे, समीर परब, रीमेश चव्हाण, अजित काणेकर, संजय पारकर, बाळू पारकर, सुनील पारकर, तेजस राणे, प्रशांत वनस्कर, अरुण परब आदी मान्यवर उपस्थित होते.
कै. श्रीधर नाईक यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने शिरवल येथील विजयराव नाईक फार्मसी कॉलेज परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी संस्था सचिव मंदार सावंत उपस्थित होते.