मिठाच्या पाण्याच्या गुळण्या केल्यास कोरोना संसर्गापासून बचाव होऊ शकतो?

स्कॉटलंडमधील एडनबर्ड युनिव्हर्सिटीतल्या संशोधकांचे महत्वाचे संशोधन

मुंबई:- मिठाच्या पाण्याच्या गुळण्या केल्यास कोरोना संसर्गापासून बचाव होऊ शकतो, कोरोनाची लक्षणं कमी केली जाऊ शकतात आणि कोरोना संसर्ग हा श्वास नलिकांवर असतो तेव्हा मीठ कोरोना व्हायरसवर विषाचं काम करते; अशाप्रकारचे महत्वाचे संशोधन स्कॉटलंडमधील एडनबर्ड युनिव्हर्सिटीतल्या संशोधकांनी केले आहे. एडनबर्ग युनिव्हर्सिटीमधील प्रोफेसर अजिज शेख यांनी संशोधनाअंती काही निष्कर्ष नोंदविले आहेत; जे दिलासादायक आहेत.

त्यांच्या अभ्यासानुसार
१) मिठाच्या पाण्याने नियमित गुळण्या केल्याने कोरोनाची लक्षणं कमी केली जाऊ शकतात.
२) मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने आपण व्हायरसपासून स्वतःला वाचवू शकतो.
३) कोरोनाची लागण झाली असेल आणि कोरोनाची कमी लक्षणं असतील त्यांच्यासाठी मिठाच्या पाण्याच्या गुळण्या फायदेशीर आहेत.
४) जेव्हा कोरोना संसर्ग हा श्वास नलिकांवर असतो तेव्हा मीठ कोरोना व्हायरसवर विषाचं काम करतो. कोरोना मिठाच्या संपर्कात येतो तेव्हा मीठ कोरोनासाठी विष म्हणून काम करते.
५) मिठाच्या पाण्याने शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता देखील वाढते.
६) मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने श्वास नलिकेतील रोग प्रतिकारक क्षमता व्हायरसवर हल्ला करून त्याला संपवायला सुरवात करते.
७) अभ्यासकांच्या मते मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने सर्दी खोकल्यावर दोन दिवसाच्या आत नियंत्रण मिळवता येतं.
८) मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने आपल्यापासून इतरांना होणार कोरोना संक्रमण देखील कमी होऊ शकतं.
९) मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि हीच रोगप्रतिकारक शक्ती व्हायरसवर थेट हल्ला करते.