आजचे पंचांग आणि दिनविशेष- मंगळवार, दिनांक ६ एप्रिल २०२१
मंगळवार, दिनांक ६ एप्रिल २०२१
राष्ट्रीय मिती चैत्र – १६
श्री शालिवाहन शके १९४२
तिथी- फाल्गुन कृष्णपक्ष दशमी २६ वा. ०९ मि. पर्यंत,
नक्षत्र- श्रवण २६ वा. ३३ मि. पर्यंत,
योग– सिद्ध १५ वा. २८ मि. पर्यंत,
करण १- वणिज १४ वा. ०९ मि. पर्यंत
करण २- विष्टि २६ वा. ०९ मि. पर्यंत
राशी- मकर अहोरात्र
सूर्योदय- ०६ वाजून ३१ मिनिटे
सूर्यास्त- १८ वाजून ५२ मिनिटे
भरती- ०७ वाजून १२ मिनिटे, ओहोटी- ०२ वाजून ०४ मिनिटे
भरती- २० वाजून ४९ मिनिटे, ओहोटी- १३ वाजून ५० मिनिटे
दिनविशेष-
१८९६ – पहिल्या आधुनिक ऑलिंपिक खेळांचे अथेन्समध्ये उद्घाटन. रोमन सम्राट थेडोसियस पहिला याने घातलेल्या बंदीमुळे १५०० वर्षे हे खेळ बंद होते.
१९१९ – महात्मा गांधींची सत्याग्रहाचे आवाहन .
१९३० – दांडीयात्रेच्या समाप्तीनंतर महात्मा गांधींनी मिठाचा सत्याग्रह सुरू केला.
१९६६ – भारतीय जलतरणपटू मिहीर सेन यांनी भारत व श्रीलंकेच्या मधील पाल्कची सामुद्रधुनी पोहून पार केली.
१९७३ – गुरू, शनी, सौर वारे आणि वैश्विक किरणांचा अभ्यास करणारे पायोनियर-११ अवकाशात प्रक्षेपित केले गेले.
१९८० – अटल बिहारी वाजपेयी यांच्या अध्यक्षपदाखाली भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली.