कोरोना- महाराष्ट्रात आज ४७ हजार २८८ नवीन रुग्णांचे निदान तर १५५ रुग्णांचा मृत्यू

मुंबई:- महाराष्ट्रात आज ४७ हजार २८८ नवीन कोरोनाबाधित रुग्णांचे निदान झाले असून २६ हजार २५२ रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर १५५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. आजपर्यंत २५ लाख ४९ हजार ७५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८३.३६% एवढे झाले. राज्यातील मृत्यूदर १.८३% एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ७ लाख १५ हजार ७९३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३०लाख ५७ हजार ८८५ (१४.७६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २४ लाख १६ हजार ९८१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २० हजार ११५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

You cannot copy content of this page