सिंधुदुर्गात आजअखेर 37 हजार 168 रुग्ण कोरोनामुक्त, १ हजार ७६ मृत्यू
सिंधुदुर्गनगरी, दि. 5 (जि.मा.का): जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 37 हजार 168 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 5 हजार 5 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 272 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण दि. 05/7/2021 ( दुपारी 12 वाजेपर्यंत )
आजचे नवीन पॉझिटिव्ह रुग्ण- 272 (5 दुबार लॅब तपासणी ) एकूण- 277
सद्यस्थितीतील सक्रीय रुग्ण- 5,005
सद्यस्थितीत उपचारासाठी जिल्ह्याबाहेर गेलेले रुग्ण- 2
आज अखेर बरे झालेले रुग्ण- 37,168
आज अखेर मृत झालेले रुग्ण- 1,076
मागील 24 तासात मृत झालेले रुग्ण- 3
आज पर्यंतचे एकूण पॉझिटिव्ह रुग्ण- 43,251