शिवार आंबेरेच्या पेजे महाविद्यालयाच्या रासेयो विभागाचे चिपळूण येथे श्रमदान व स्वच्छता अभियान
रत्नागिरी- तालुक्यातील शिवार आंबेरे येथील लोकनेते शामरावजी पेजे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या स्वयंसेवकांनी काल सोमवार दिनांक २ ऑगस्ट रोजी पूरग्रस्त चिपळूणच्या शहरातील शंकर वाडी व खेर्डी येथे श्रमदान व स्वच्छता केली. काल दिवसभरात या स्वयंसेवकांनी तीन ठिकाणी तीन घरे चिखल मुक्त व गाळ मुक्त करून स्वच्छता केली आणि पूरग्रस्त चिपळूणकरांना एक मदतीचा हात दिला आहे.
याप्रसंगी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक नितेश केळकर व सहाय्यक प्राध्यापक सचिन कुळ्ये आणि चिपळूण येथील सामाजिक कार्यकर्ते विलास डिके हे उपस्थित होते. याकरिता महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य राकेश आंबेकर यांचे मार्गदर्शन लाभले.