आध्यात्मिक आणि सामाजिक सेवेची बांधिलकी जोपासणारा आनंद युवा संघ!
आधुनिकता स्वीकारताना समाजाने आपल्या संस्कृतीचा, आपल्या सुसंस्कृत धर्माचा, उचित परंपरेचा मार्ग जोपासला पाहिजे. त्यासाठी आनंद युवा संघ (नोंदणीकृत) गेली सात वर्षे निष्ठने कार्यरत आहे. आनंद युवा संघाच्या माध्यमातून नियमितपणे समाजासाठी विविध उपक्रम राबविले जातात.
आनंद युवा संघाची स्थापना २६ मे २०१८ रोजी झाली. ह्या संस्थेचे संस्थापक नामवंत कीर्तनकार, संगीत व आध्यात्मिक भजनी बुवा सन्मा. नंदादीप वंजारे आहेत. संघाचे अध्यक्ष ह. भ. प. यशवंत आईर, सचिव ह. भ. प. प्रसाद मोरे, कार्याध्यक्ष आणि सल्लगार ह. भ. प. सौ. उमाताई तेंडोलकर ( कीर्तन मधुकर) असून उच्चशिक्षित सुसंस्कारित युवक सभासद आहेत. संघाच्या माध्यमातून संगीत क्षेत्रात गरजूंना विनामूल्य पखवाज, तबला शिक्षण दिले जाते. गेल्या दोन वर्षांपासून नवोदित कलाकारांना कीर्तन, पारंपरिक भजनासाठी हक्काचे व्यासपीठ सन्मानपूर्वक दिले जाते. त्यामुळे तरुणांमध्ये कीर्तन, भजन व सत्संगाची गोडी निर्माण होते. सामाजिक सेवेच्या माध्यमातून गरजू मुलांना जमेल तितकी शिक्षणासाठी मदत आनंद युवा संघ करीत असतो. कोरोना महामारीच्या काळात मोठ्या प्रमाणात अन्न धान्याचे विनामूल्य वाटप करून संघाने केलेले महान कार्य माणुसकीचे धडे देणारे आहे. भविष्यामध्ये कीर्तन, गायन, पखवाज, तबला ह्याचे विनामूल्य प्रशिक्षण देणारी संगीत शाळा तयार करण्याचे ध्येय आनंद युवा संघाचे आहे.
आनंद युवा संघास अनेक नामवंत अधिकारसंपन्न व्यक्तींचे सहकार्य लाभते. त्यात नामवंत कीर्तनकार, भजनी कलावंत, साहित्यिक, व्यावसायिक असे अनेक हितचिंतक समाविष्ट असतात. आनंद युवा संघाचे आध्यात्मिक आणि सामाजिक कार्य संपन्न झाल्यावर अनेक नवनवीन तरुण मंडळी संघाच्या कार्यात स्वतःहून सहभागी होतात. आनंद युवा संघाचे जयेश राजीवडेकर, स्वप्नील परब, गुरु पाताडे यांच्यावतीने कोकणात शिक्षण, व्यसनमुक्ती, हिंदूधर्म रक्षण असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
भविष्याचा वेध घेत समाजाने सुसंस्कारित होण्यासाठी आनंद युवा संघ येत्या काळात नवनवीन आध्यात्मिक व सामाजिक उपक्रम राबविणार आहे. त्यातून येणारी पिढी नक्कीच सुसंस्कारित होईल! आनंद युवा संघाच्या कार्यास आमचा सलाम आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा! परमात्मा सद्गुरू आनंद युवा संघास यश देवो; ही सद्गुरू चरणी प्रार्थना!
-नरेंद्र हडकर
हेही वाचा!
प. पू. गगनगिरी महाराज सिद्ध तपोवन मनोरी आश्रमात चक्री कीर्तन सोहळा
हेही वाचा!