आदर्श आमदाराचं प्रतिक म्हणजेच डॉ. भारती लव्हेकर!

लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यानंतर मतदारांना विसरून जायचे असते आणि आपले राजकीय अस्तित्व ठिकविण्यासाठी किंवा राजकीय ताकद वाढविण्यासाठी कार्यरत राहायचे अशी पद्धत सुरु असताना मात्र खऱ्या अर्थाने मतदारसंघातील मतदारांच्या गरजा कोणत्या आहेत आणि त्यांना कोणत्या चांगल्या सुखसोयी देता येतील? याचा नुसता विचार न करता प्रत्यक्षात कृतीवर भर देणारे लोकप्रतिनिधी हाताच्या बोटावर मोजण्या इतपतच असतात. अशा आदर्श लोकप्रतिनिधींमध्ये आमदार डॉ. भारती लव्हेकर यांचे नाव मोठ्या अभिमानाने घेता येईल. मुंबई उपनगरातील वर्सोवा विधानसभा मतदार संघाच्या डॉ. भारती लव्हेकर यांनी आमदार म्हणून केलेले कार्य उल्लेखनीय असून त्यांच्या कार्याची दखल देशपातळीवर नेहमीच घेतली जाते.

सॅनिटरी पॅडची बॅंक सुरु करणाऱ्या महिला व आमदार

डॉ. भारती लव्हेकर या भारतातील महिलांसाठी सॅनिटरी पॅडची बॅंक सुरु करणाऱ्या महिला व आमदार ठरल्या. त्यांना गतवर्षी भारताच्या फर्स्ट लेडी पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांनी एका सामाजिक संस्थेच्या माध्यमातून वर्सोवा मतदारसंघात सार्वजनिक ठिकाणी व शाळांमध्ये सॅनिटरी पॅड एटीएम व डिस्पोजल मशीन बसविल्या. त्याचप्रमाणे स्त्रीभ्रूण हत्या प्रतिबंध, महिला आरोग्य व शिक्षण, क्रिडा, विविध समाजपयोगी कार्य त्यांनी यशस्वीपणे केले आहे.

मुंबई मनपाच्या ३ हजार विद्यार्थिनींना दरमहा नियमित १० सॅनिटरी पॅड

मुंबई मनपाच्या ५२ शाळांमधून ३ हजार विद्यार्थिनींना दरमहा नियमित १० सॅनिटरी पॅड मोफत देण्याचे कार्य आमदार डॉ. भारती लव्हेकर करतात. त्याचबरोबर त्या विद्यार्थिनींची मोफत आरोग्य तपासणी केली जाते. आमदार डॉ. भारती लव्हेकर यांचा हा अभिनव उपक्रम लोकप्रिय झाला आहे. अशाप्रकारचा हा राज्यातला पहिलाच उपक्रम आहे. स्वतः आमदार डॉ. भारती लव्हेकर संस्थापक अध्यक्ष असलेल्या ‘ती फाउंडेशन सॅनिटरी पॅड बँके’च्या माध्यमातून हा स्तुत्य उपक्रम गतवर्षीपासून सुरु झाला आहे.

महिलांच्या त्या ५ दिवसांच्या वेदना अधिक सुसह्य करून त्यांना सॅनिटरी पॅड्सची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ‘ती फाउंडेशन सॅनिटरी पॅड बँक’ कार्यरत असून ‘ती फाउंडेशन सॅनिटरी पॅड बँके’ च्या माध्यमातून सॅनिटरी पॅड्सचे मोफत वाटप, मोफत सॅनिटरी पॅड एटीएम व्हेंडिंग मशीन, डिस्पोझल मशिन्स, मॅनस्ट्रुअल हेल्थ किटची सुविधा उपलब्ध करून दिली जाते.तसेच महिलांना स्त्रीरोगतज्ज्ञांचा मोफत सल्लाही उपलब्ध करून दिला जातो. ‘ती फाउंडेशन सॅनिटरी पॅड बँके’ तर्फे दरमहा गरीब विद्यार्थिनी आणि स्त्रियांना १० सॅनिटरी पॅडचे मोफत वाटप केले जाते. मेन्स्ट्रुअल हेल्थ किटमध्ये विविध सूचना, मानसिक आधार देण्यासाठीची माहिती, २ निकर्स, पेनकिलर्स आणि सॅनिटरी पॅड्स या गोष्टी देण्यात येतात.

जुन्नर तालुक्यातील आलमे येथील शासकीय अनुदानित आदिवासी आश्रम शाळेतील ५५ गरीब आदिवासी विद्यार्थिनींना नियमितरित्या दरमहा १० सॅनेटरी पॅड उपलब्ध करून दिले जातात. महाराष्ट्रातील इतर शाळांमध्येही हा उपक्रम राबवण्याचा मानस आमदार डॉ. भारती लव्हेकर यांचा आहे.

देशातील उत्तर प्रदेश, पंजाब, आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटक, तामिळनाडू, हरियाणा, चंदीगड या विविध राज्यांमधून ‘ ती फाउंडेशन सॅनिटरी पॅड बँके’ ला चांगला प्रतिसाद लाभत आहे. तर अफगाणिस्तान, पाकिस्तान, आफ्रिकासारख्या देशातून पॅड्सची मागणी येते. एड्सग्रस्त महिला आणि रेड लाईट भागात पॅड पुरवण्याची मागणी पॅड बँकेला आली असून चेन्नई मधील एका शाळेची मोफत सॅनिटरी पॅड्सची मागणी आहे, अशी माहिती आमदार डॉ. भारती लव्हेकर देतात.

मकरसंक्रांतीच्या हळदीकुंकवाला सौभाग्याचे लेणे असलेल्या विविध गोष्टी वाण म्हणून देण्याची प्रथा आहे. याच प्रथेला जोड देऊन सामाजिक भान जपत आमदार डॉ. भारती लव्हेकर यांनी समाजापुढे एक नवा संकल्प उभा केला.

आमदार डॉ.लव्हेकर यांच्या डॉटर्स ऑफ वर्सोवा’ या मोहिमेअंतर्गत वर्सोव्यामधील ८ शाळा कॉलेज, २ पोलीस स्टेशन्स आणि के पश्चिम पालिका विभाग कार्यालयातही त्यांनी मोफत सॅनिटरी पॅड एटीएम आणि डिस्पोझल मशिन्स बसविल्या आहेत.

आमदार डॉ. भारती लव्हेकर ‘बेटी बचाव, बेटी पढाओ ‘ या मोहिमेचाही प्रचार व प्रसार करत असून गेल्या साडेतीन वर्षांपासून ‘ डॉटर्स ऑफ वर्सोवा’ मोहीम राबवत असून त्याअंतर्गत ज्या घरी मुलगी जन्मते तिथे जाऊन त्या मुलीचे स्वागत करून समाजामध्ये मुली वाचवा त्यांना शिक्षण द्या असा संदेश त्या देतात.

राष्ट्रपतींकडून गौरव तर पंतप्रधानांकडून कौतुक!

आमदार डॉ. भारती लव्हेकर यांच्या कामाची पोचपावती म्हणून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गेल्यावर्षी २० जानेवारी रोजी राष्ट्रपती भवन येथे ‘फर्स्ट लेडी’ या बहुमानाने गौरविले. तसेच ‘जागतिक महिला दिनी’ विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करत आपल्या नावाचा ठसा उमटवणाऱ्या देशातील केवळ ४०० कर्तबगार महिलांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे पत्र लिहिले होते. आमदार डॉ. भारती लव्हेकर यांच्या कामाची दखल घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र लिहून त्यांचे कौतुक करून ‘राष्ट्रीय पोषण मिशन’ या भारत सरकारच्या नव्या योजनेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.

राष्ट्रीय पोषण मिशन अंतर्गत देशातून कुपोषण हटवण्याचा मानस असून या योजनेचा मुख्य उद्देश बुटकेपणा, अल्प पोषण, रक्ताची कमतरता आणि कमी वजनाच्या शिशूंची संख्या कमी करणे आहे.

मुंबईतील वाहतूक कोंडी जीवघेणी ठरत असताना वर्सोवा विधानसभा मतदार संघात वाहतूक कोंडीवर त्यांनी प्रशासन आणि वाहतूक पोलिसांच्या मदतीने केलेल्या उपाययोजना प्रभावी ठरत आहेत.

राज्यव्यवस्थेसाठी लागणाऱ्या प्रशासकीय तरतुदींचा सविस्तरपणे करण्यात आलेला अंतर्भाव यामुळे राज्यघटनेचे स्वरूप विस्तृत बनले आहे. अशी वैशिट्यपूर्ण राज्यघटना कशी बनली, सर्वसामान्यांना त्याची ओळख करून देण्याच्या दृष्टीने मुंबईमध्ये कॉन्स्टिट्यूशन भवन बांधावे आणि त्या भवनाचे पर्यटनस्थळ करावे; अशी संकल्पना आमदार डॉ.भारती लव्हेकर यांनी विधानसभेत मांडली. सदर संकल्पना मूर्त स्वरूपात येण्यासाठी त्यांचे प्रयास सुरु आहेत.

वर्सोव्यतील नागरिकांना स्वस्त दरात औषध उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आमदार डॉ. भारती लव्हेकर वर्सोव्यात जेनेरिक मेडिसिन्सची चळवळ सुरू केली आहे; तीही कौतुकास्पद आहे. वर्सोव्यातील पहिल्या जेनेरिक मेडिसीन स्टोअर्सचे त्यांनी गेल्यावर्षी उद्घाटन केले.

स्वतंत्र विकास नियंत्रण नियमावलीमुळे मुंबईतील ३४ कोळीवाड्यांचे आता सीमांकन होणार असून याचा फायदा मुंबईतील सुमारे ५ लाख कोळीबांधवांना होणार आहे. आमदार डॉ.भारती लव्हेकर यांनी कोळीवाड्यांचे नवीन विकास आराखड्यात स्वतंत्र सीमांकन करावे यासाठी त्यांनी येथून २०१४ साली आमदार म्हणून निवडून आल्यावर सातत्याने मुख्यमंत्र्यांकडे व विधानसभेत पाठपुरावा केला होता. त्यामुळे वेसावकरांनी आमदार भारती लव्हेकर यांचे आभार मानले.

अशा पद्धतीने मतदारसंघाचा सर्वांगिण विकास करण्यावर आमदार डॉ. भारती लव्हेकर यांचा नेहमीच भर असतो. त्यांनी गेल्या चार वर्षाच्या कालावधीत आदर्श लोकप्रतिनिधी आमदार कसा असावा? त्याचे उदाहरण जनतेसमोर ठेवले आहे.

-मोहन सावंत