महा रक्तदान शिबीर- ८ हजार, ७७० बाटल्या रक्त जमा!
२१ एप्रिल २०१९ रोजी महा रक्तदान शिबीर होणार!
महा रक्तदान शिबीर- ८ हजार, ७७० बाटल्या रक्त जमा!
‘श्री अनिरुद्ध उपासना फाउंडेशन’ व संलग्नित संस्था आयोजित
रक्तदान शिबिरात आजपर्यंत १ लाख ३८ हजार ५११ बाटल्या रक्त जमा!
मुंबई- मुंबईसह महाराष्ट्रामध्ये २२ एप्रिल २०१८ रोजी ‘श्री अनिरुद्ध उपासना फाउंडेशन’ व संलग्नित संस्था आयोजित अनेक ठिकाणी भव्य रक्तदान शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरांमध्ये मुंबई व मुंबई जवळील विभागांमध्ये एकूण ६३८९ बाटल्या, पुणे विभागामधून १६४० बाटल्या, कोल्हापूर मधून ४२४ व महाराष्ट्रातील इतर विभागांमधून ३१७ बाटल्या रक्त जमा झाले. अशा एकूण ८७७० श्रध्दावानांनी या शिबीरांमध्ये रक्तदान करुन आपल्या सद्गुरुंच्या आज्ञेचे पालन केले.
या रक्तदान शिबीरांमध्ये प्रत्येक केंद्रातील कार्यकर्त्यांनी तसेच ‘श्री अनिरुद्ध उपासना फाउंडेशन’ व संलग्नित संस्थांनी अनेक महिने आधी पासूनच अतिशय छान प्रकारे सेवा कार्य करून उत्तम नियोजन केले. आधुनिक तंत्राचा वापर करून तज्ञांकडून रक्तदानाविषयी जागृती करण्यात आली. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबीर नेहमीप्रमाणे यशस्वी झाले.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सुनिलसिंह मंत्री यांनी दिलेल्या निवेदनात म्हणतात की, या भव्य रक्तदान शिबीरामध्ये प्रचंड यश मिळाल्याबद्द्ल सगळ्या कार्यकर्त्यांचे व श्रद्धावानांचे अभिनंदन व मोठी आई व सद्गुरु श्रीअनिरुद्धांची कृपा आपल्या सगळ्यांवर अशीच राहो ही त्यांच्या चरणी प्रार्थना. आपल्याला, पुढील वर्षी अजून मोठ्या प्रमाणात अशाच भव्य रक्तदान शिबीरांचे आयोजन पूर्ण महाराष्ट्रभर करावयचे आहेत. संस्थेतर्फे पुढील मेगा ब्लड डोनेशन कॅम्प रविवार दि. २१ एप्रिल २०१९ रोजी आयोजित करण्यात येणार आहे. यावेळेस
ज्याप्रकारे मुंबई बाहेरील उपासना केंद्रांनी आपआपल्या ठिकाणी एकत्रित येऊन मेगा ब्लड डोनेशन कॅम्पमध्ये सहभाग घेतला त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व उपासना केंद्रांना विनंती आहे कि, त्यांनी २१ एप्रिल २०१९ रोजी होणार्या मेगा ब्लड डोनेशन कॅम्पमध्ये सहभाग घ्यावा. केंद्रांनी जिल्हानुसार एकत्र येऊन लोकल जिल्हा समितीस विश्वासात घेऊन आपले प्रस्ताव सी.सी.सी.सी. कडे पाठवावेत. जे उपासना केंद्र किंवा पुरुषार्थ मंडलमकलश काही कारणाने यावर्षी या मेगा ब्लड डोनेशन कॅम्पचा भाग होऊ शकले नाहीत त्यांनी नक्कीच या आगाऊ माहितीचा लाभ घ्यावा व त्यानुसार प्लानिंग करावे; असे आवाहन करण्यात आले आहे.