राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षा पुढे ढकलल्या

मुंबई:- राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या उच्च शिक्षण आणि तंत्र शिक्षण विभागाच्या विविध विषयांच्या प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

श्री. सामंत म्हणाले, राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या (CET- सेल) माध्यमातून दरवर्षी उच्च शिक्षण आणि तंत्र शिक्षण विभागाच्या विविध विषयांच्या प्रवेश परीक्षा घेण्यात येतात. सध्या संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात कोविड- १९ चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *