सिंधुदुर्ग जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे सायकल रॅली संपन्न

सिंधुदुर्गनगरी:– महात्मा गांधी जयंती निमित्त तसेच स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे आयोजित जिल्हा न्यायालय ते ओरोस फाटा सायकल रॅली संपन्न झाली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश एस.वी. हांडे यांनी या रॅलीला हिरवा झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात केली.

यावेळी जिल्ह्या न्यायाधिश- 1 व अतिरिक्त सत्र न्यायाधिश आर.बी.रोटे, मुख्य न्यायदंडाधिकारी ए.एम.फडतरे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव डी.बी.म्हालटकर, अतिरिक्त सह दिवाणी न्यायाधिश पी.आर.ढोरे, डी.वाय. रायरीकर, न्यायालय व्यवस्थापक पी.पी.मालकर आणि प्रभारी अधिक्षक जिल्हा विधी सेवा प्राधिकरण श्री. खडपकर आदी उपस्थित होते.

जिल्हा न्यायालय येथून सुरू झालेली ही रॅली जिल्हा रुग्णालय, रानबांबुळी, ओरोस फाटा, जिजामाता चौक, जिल्हा परिषद कॉलनी मार्गे पुन्हा जिल्हा न्यायालय येथे पोहचली. या रॅलीच्या माध्यमातून महात्मा गांधींचे विचार आणि समाज जागृतीपर संदेश देण्यात आले.

तसेच पोलीस परेड ग्राऊंड येथे नेहरू युवा केंद्राच्या वतीने महात्मा गांधी जयंती निमित्त फिट इंडिया फ्रिडम रनचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस परेड ग्राऊंडपासून सुरू झालेली ही रन ओरोस फाटा ते पुन्हा पोलीस परेड ग्राऊंड येथे समाप्त झाली. यावेळी नेहरु युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक मोहितकुमार सैनी, एनसीसी कमांडर दिनेश गेडाम, प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे, एनएसएस सुभाष बांबुळकर, क्रीडा अधिकारी मानकसिंग बसी आदी उपस्थित होते. या रनमध्ये एनसीसी आणि एनएनएसचे विद्यार्थ्यी सहभागी झाले होते.

You cannot copy content of this page