डॉ. सानिका सावंत यांच्या वैद्यकीय सेवेचा शुभारंभास शुभेच्छा!
आयुष्यामध्ये असे काही क्षण असतात – घटना असतात त्याची कधी विस्मृती होत नाही! जर ते क्षण आनंदाचे, स्वप्नपूर्तीचे आणि पवित्र ध्येयाकडे वाटचाल करणारे असतील तर ते क्षण हृदयात जपून ठेवावे लागतात! कारण असे क्षण मानवाच्या जीवनात सद्गुरु कृपेशिवाय येऊ शकत नाहीत! म्हणूनच त्या सुवर्णक्षणाच्या अर्थात सद्गुरु कृपेच्या स्मृतीला जपण्यासाठी आजचा संपादकीय स्तंभ!

५ सप्टेंबर २०२५ रोजी शुक्रवारी सायंकाळी मुंबईच्या माजी महापौर, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा, ज्येष्ठ सामाजिक नेत्या, ज्येष्ठ विधीज्ञ निर्मलाताई सामंत प्रभावळकर यांच्या हस्ते आणि माजी नगरसेविका श्रीकला पिल्ले, डॉ. श्रीनिवास पाटील, डॉ. सुरेश माने अशा मान्यवरांच्या उपस्थितीत अंबज्ञ क्लिनिक’चा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. त्यावेळी मलाही कुटुंबियांसह उपस्थित राहण्याचे भाग्य मिळाले! डॉ. सानिका मुग्धा मोहन सावंत हिने वैद्यकीय क्षेत्रात बीएएमएस आणि एमएस ह्या पदव्या मिळविल्या. त्यानंतर मुंबईच्या नामांकित भाटिया रुग्णालयात सेवा दिली आणि आता समाजाची वैद्यकीय सेवा करण्यासाठी स्वतःच्या `अंबज्ञ क्लिनिक’चा शुभारंभ केला! हीच ती घटना सद्गुरू कृपेने अनुभवता आली.
वैद्यकीय क्षेत्रात पद्युत्तर पदवी घेऊन स्वतःच्या वैद्यकीय व्यवसायाचा शुभारंभ करण्यापर्यंत डॉ. सानिका हिच्यासह तिची आई सेवानिवृत्त शिक्षिका सौ. मुग्धा सावंत आणि महाराष्ट्र शासनाच्या विविध खात्यात सेवा देऊन सेवानिवृत्त झालेले वडील मोहन सावंत यांचे खडतर परिश्रम फलद्रुप झाले! पवित्र ध्येयाचा संकल्प करून त्यास परिश्रमांची जोड दिली जाते; तेव्हा सद्गुरू कृपेची सिद्धता अवतरते. `अंबज्ञ क्लिनिक’च्या माध्यमातून हे सगळं साकारलं म्हणूनच श्री. मोहन सावंत यांच्या कुटुंबियांचे कौतुक करावे तेवढेच थोडेच आहे!
कुमारी डॉ. सानिका मोहन सावंत हिने बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी ही पदवी प्राप्त केली. हा भारतीय वैद्यकीय प्रणालीतील ५.५ वर्षांचा पदवीपूर्व पदवी कार्यक्रम आहे, जो पारंपारिक आयुर्वेदिक पद्धतींना आधुनिक वैद्यकीय शास्त्रांशी जोडतो; आणि ज्याचा शेवट एक वर्षाच्या अनिवार्य इंटर्नशिपसह होतो. ह्यामध्ये आयुर्वेदिक मूलतत्त्वे शिकविली जातात. ह्या अभ्यासक्रम आयुर्वेद, पारंपारिक भारतीय औषध प्रणालीच्या तत्त्वांवर आणि पद्धतींवर केंद्रित आहे. तसेच ह्या अभ्यासक्रमात आधुनिक शरीरशास्त्र, शरीरक्रियाविज्ञान आणि इतर आधुनिक वैद्यकीय शास्त्रांचाही समावेश असतो. त्याचबरोबर प्रत्यक्ष वैद्यकीय अनुभव आणि रुग्णालयात एक वर्षाची अनिवार्य इंटर्नशिप समाविष्ट असते. ह्या पदवीधरांकडे आयुर्वेदिक चिकित्सक म्हणून सराव करण्यास पात्रता असते. ते प्राचीन ज्ञान आणि समकालीन वैद्यकीय शास्त्र ह्याआधारे रुग्णांवर उपचार करतात.
कुमारी डॉ. सानिका मोहन सावंत अखिल भारतीय आयुर्वेद पदव्युत्तर प्रवेश परीक्षेत संपूर्ण भारतातून ७२ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली. त्यामुळे BAMS नंतर MS चे शिक्षण पूर्ण करण्याचा मार्ग तिच्यासाठी मोकळा झाला.
MS (Master of Surgery in Ayurveda) ही एक पदव्युत्तर (Postgraduate – PG) वैद्यकीय पदवी आहे. ही पदवी पारंपरिक आयुर्वेद शस्त्रक्रिया विषयात उच्च शिक्षण व तज्ञता मिळवण्यासाठी असते. MS (Proctology) शाखेत गुदरोगांचे निदान (Clinical & Laboratory diagnosis), शस्त्रक्रियात्मक व शस्त्रक्रिया-पूर्व व पश्चात काळजी, कषारसूत्र (Ksharasutra therapy) – आयुर्वेदातील अद्वितीय तंत्र, विशेषतः भगंदर व पाइल्स, आधुनिक शल्यक्रिया पद्धती
(Laser surgery, Stapler surgery, Open/Closed hemorrhoidectomy) ह्या शास्त्रात तज्ञता बहाल करते व गुदरोगांमध्ये नॉन-इन्फेसिव्ह (कमी त्रासदायक) आयुर्वेदीय पद्धती (कषारसूत्र) व आधुनिक शल्यक्रिया दोन्ही शिकवले जातात. तसेच आयुर्वेद व आधुनिक वैद्यकाचा समन्वय साधला जातो.
कुमारी डॉ. सानिका मोहन सावंत हिने BAMS, MS ( Proctologist) ह्या वैद्यकीय व आयुर्वेदातील सर्वोच्च पदव्या घेतल्यानंतर मुंबईच्या नामांकित भाटिया हॉस्पिटलमध्ये रुग्णांना सेवा दिली आणि आता स्वतःच्या `अंबज्ञ क्लिनिक’चा शुभारंभ केला!
वडील मोहन सावंत शासकीय निवृत्त वरिष्ठ लिपिक आणि आई मुग्धा सावंत निवृत्त शिक्षिका यांच्या मार्गदर्शनातून आणि परमपूज्य सद्गुरु अनिरुद्ध बापूंच्या कृपेतून कु. डॉ. सानिका यांनी मिळविलेले सुयश खरोखरच कौतुकास्पद आणि आमच्यासाठी अभिमानास्पद आहे! समाजातील दुर्लक्षित घटकांची सेवा करण्यासाठी त्या नेतृत्व करतील; अशी त्यांची वाटचाल आहे. त्यासाठी आवश्यक असणारे सुसंस्कार त्यांना आई-वडिलांनी दिले आहेत. समाजहितासाठी विधायक विचारांची बैठक आणि त्या विचारांच्या अधिष्ठानातून नियोजनबद्ध कृती आवश्यक असते आणि असे कार्य मोहन सावंत नियमित करीत असतात. त्यांच्याच प्रेरणेने आणि शिस्तबद्ध आईच्या सहवासात कु. डॉ. सानिका यांनी आपल्या ध्येय पूर्ततेची अंतिम पायरी गाठली आहे. वैद्यकीय सेवेचे खूप मोठे कार्य घडण्यासाठी डॉ. सानिका यांना सामर्थ्य मिळावे; ही आदिमाता आणि सद्र्गुरु चरणी प्रार्थना!
-नरेंद्र हडकर