शाळा सुरु करण्याची घाई म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ…?

कोरोनाने जगात हाहाकार माजवला. आजपर्यंत जगात ७० लाखांपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली; तर ४ लाखांपेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडले. भारतात अडीच लाखांपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आणि सुमारे साडेसात हजार लोक मृत्युमुखी पडले.

कोरोनामुळे शासनाने २२ मार्चपासून लॉकडाउन केले. पण दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधीत शासनाला वैद्यकीयदृष्ट्या सक्षमता वाढवता आली नाही. आपत्कालीन परिस्थितीत भारतातील जनतेला शासनाच्या भोंगळ कारभाराचा जीवघेणा फटका बसला. कोणत्याही परिणामांची पर्वा न करता शासन नवनवीन प्रयोग करीत आहे.

एकीकडे अर्थव्यवस्था सांभाळताना दुसरीकडे कोरोनाचा प्रभाव नाहीसा करण्याचे कार्य शासनाला करावेच लागणार आहे. घाईने निर्णय घेऊन जनतेला किती त्रास होतो? हे पाहून नंतर निर्णय घेण्यापेक्षा तज्ञांचा सल्ला घेऊन विचारपुर्वक निर्णय आपत्कालीन परिस्थितीत घ्यावा लागतो. अशाप्रकारे शाळा सुरु करण्याची घाई शासन करणार आहे; असे वाटते.

त्यासंदर्भात मनसेच्या अमित पारके यांनी काही प्रश्न विचारले आहेत. त्यातील महत्वाचे प्रश्न असे…

१५ जूननंतर होणार शाळा सुरु..? खालीलपैकी एका जरी प्रश्नाचे उत्तर देता आले तर नक्की शाळा सुरू करा…

१) कोरोनावर खात्रीशीर औषध सापडले आहे का?
२) लहान मुलांची रोगप्रतिकार क्षमता कमी नसते का?
३) प्रत्येक बेंचवर ऐक विद्यार्धी बसवाल…पण सध्या ऐका बेंचवर तीन तीन विद्य़ार्धी दाटीवाटीने बसविले जातात..त्या पटसंख्येच्या मानाने..जास्त बेंच व खोल्या लागतील…त्या कशा उपलब्ध करणार?
४) शाळा भरताना व सुटल्यावर होणारी गर्दी कशी टाळणार?
५) मधल्या सुट्टीत टाँयलेटमध्ये गर्दी होते त्याचे नियोजन काय?
६) जिथे मोठी माणसे ऐकत नाहीत…तिथे लहान मुले ऐकतील का?
७) मोठ्या माणसांना त्रास झाला तर नेमके काय होतय सांगता येते…लहान मुले सांगू शकतील का?
८) सर्व व्यवस्थित आहे; हे दाखविण्यासाठी शाळा सुरू करायच्या आहेत का?
९) प्रत्येक मुलाकडे लक्ष देणे शिक्षकांना शक्य आहे का?
१०) पहिले काही दिवस नियम पाळले जातील, नंतर दुर्लक्ष होणार नाही का ?
११) शाळेत संसर्ग झाला तर शालेय संस्था जबाबदारी स्विकारुन पुढील सहकार्य करतील की हात झटकून जबाबदारी टाळतील ?
१२) मुलांवर प्रयोग करण्यापेक्षा संसदेचे- विधानसभेचे अधिवेशन घेऊन कोरोना संसर्ग वाढतो की नाही हे पाहणे योग्य नाही का ?
१३) स्कुलबस-रिक्षावाले मुलांची ने आण करताना नियम पाळतील?
१४) उद्या शाळेत एखाद्या विद्यार्थ्यांला कोरोनाची लागण झाली, तर वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे-शिक्षकांचे अलगीकरण करावे लागेल. त्याचे नियोजन काय?
१५) अलगीकरणकरीता आपल्या मुलाला /मुलीला एकटे सोडण्याची कुठल्या पालकांची तयारी होईल?
१६) बहुतेक पालकांना अलीकडे एक किंवा दोन अपत्ये आहेत; त्यांच्या मुलांचे काही बरे वाईट झाले तर ते कोणाच्या आधारे जगणार?
१७) शिक्षण महत्त्वाचे की मुले? एक वर्ष मुलाने कमी अभ्यास केला किंवा नाही केला तर असे किती नुकसान होणार आहे?
१८) प्रयोग करुन पहायला मुले काय माकडे किंवा उंदीर आहेत का ?

असे अनेक प्रश्न प्रत्येक पालकांच्या मनात आहेत. विद्यार्थ्यांचे आयुष्य पालकांसाठी महत्वाचे आहे तसेच देशासाठीही. म्हणूनच अमित पारके यांनी पालकांच्यावतीने विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे मिळायला पाहिजेत. शैक्षणिक क्षेत्रावर आधारित अर्थव्यवस्था सांभाळण्यासाठी विद्यार्थ्यांचे आयुष्य कोरोनाच्या पटावर का लावायचे? हा प्रश्न विचारपुर्वक हाताळायला पाहिजे.

-चिंतामणी हडकर

You cannot copy content of this page