फिफा विश्वचषक २०१८- फ्रान्स विश्वविजेता
मॉस्को: – फिफा विश्वचषक २०१८ च्या अंतिम सामान्यत फ्रान्सने क्रोएशियाला ४-२ ने हरवून बाजी मारली आहे. आजच्या अंतिम सामन्याकडे जगभरातील फुटबॉल चाहत्यांच्या नजरा लागल्या होत्या. १९९८ मध्ये फ्रान्स विश्वविजेता ठरला होता. वीस वर्षांनी पुन्हा एकदा फ्रान्सने इतिहास घडविला. एकपेक्षा अधिक वेळा वर्ल्डकप जिंकणारा फ्रान्स सहावा देश ठरला आहे.