Happy Birthday, Google- ‘गुगल’ साजरा करतोय स्वतःचा २० वा वाढदिवस
मुंबई:- कोणतीही माहिती जाणून घ्यायची असल्यास आपसूकपणे आपण गुगल सर्च इंजिनाचा उपयोग अगदी सहजपणे करतो. माहिती शोधता शोधात आणि आम्हाला माहितीचा स्रोत पुरविता पुरविता ‘गुगल’ने अनेक उपयुक्त सोयी उपलब्ध करून दिल्या. आज गुगलचा विसावा वाढदिवस आहे. जगातील अनेक नामवंत व्यक्तींचे वाढदिवस साजरे करताना गुगलच्या होम पेजवर गुगल खास डुडल बनविते. आज स्वतःच्या वाढदिवसाच्या निमित्त खास डुडल प्रसिद्ध केले आहे. लॅरी पेज आणि सर्जी ब्रेन यांनी गुगलची स्थापना केली व अधिकृतपणे ‘गुगल’ हे नाव ठेवत १९९७ साली कंपनीनं डोमेन रजिस्टर केलं. गुगल हे सर्च इंजिन भारतातील ९ भाषांमध्ये आणि जगभरातल्या १२४ भाषांमध्ये उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे गुगलच्या अनेक उपयुक्त सोयी जगातील आधुनिक पिढीला भुरळ घालीत आहेत.